भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सार्थ ठरवत भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने शतक झळकावले. केएल राहुल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या शुभमनने पहिले शिखर आणि नंतर इशान किशनसोबत मिळून डाव सावरला. विशेष म्हणजे इशान किशन सोबत डाव सावरत असताना शुभमनने आपल्या धवगतीमध्ये कमी येऊ दिली नाही.
A brilliant CENTURY for @ShubmanGill 👏👏
His maiden 💯 in international cricket.
Well played, Shubman 💪💪#ZIMvIND pic.twitter.com/98WG22gpxV
— BCCI (@BCCI) August 22, 2022
शुभमन गिलयाने केवळ ८२ चेंडूत शतक झळकावत या मालिकेतील पहिला शतकवीर होण्याचा बहुमान पटकावला आहे. शिवाय हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक ठरले आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि केएल राहुलनंतर शुभमन गिलने देखील आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झिम्बाब्वेविरुद्ध झळकावण्याचा विक्रम केला आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गिलनंतर आता किशनची बॅट तळपली! तिसऱ्या वनडेत झळकावले तडफदार अर्धशतक
हे पाप कुठे फेडणार? विजयानंतरही पाकिस्तानवर होतोय चिटींग केल्याचा आरोप, जाणून घ्या कारण