---Advertisement---

विश्वचषक विजेत्या शुबमन गिलची अंपायरला शिवीगाळ? मॅचवर झाला असा परिणाम

On: शुक्रवार, जानेवारी 3, 2020 6:41 PM
---Advertisement---

भारतात रणजी ट्रॉफीची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेची चौथी फेरी आजपासून(3 जानेवारी) सुरु झाली आहे. मात्र या फेरीतील पंजाब विरुद्ध दिल्लीच्या सामन्यात एक मोठा वाद झालेला आज पहायला मिळाला.

या सामन्यात पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. त्यावेळी सलामीवीर फलंदाज शुबमन गिल 10 धावांवर खेळत असताना दिल्ली संघाने त्याचा सुबोध भाटीच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल गेला म्हणून अपील केले.

मात्र गिलने खेळपट्टी सोडून जाण्यास नकार दिला. तसेच त्याने पंचांशीही वाद घातला. अखेर सामनाधिकाऱ्यांना मधे पडावे लागले.

या विवादाबद्दल टाईम्स ऑफ इंडियाच्या एका पत्रकाराने ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटनुसार पंचांचा निर्णय गिलला पसंत पडला नाही. त्यामुळे त्याने खेळपट्टी सोडण्यास नकार दिला. तसेच या पत्रकाराने पुढे असा दावा केला की दिल्लीचा उपकर्णधार नितिश राणा म्हणाला, शुबमनने पंचांना अपशब्द वापरले. त्यानंतर लगेचच पंचांनी त्यांचा निर्णय बदलला.

त्यामुळे दिल्ली संघाने बादचा निर्णय बदलण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि खेळण्यास नकार दिला. अखेर सामनाधिकारी पी रंगनाथन यांनी हस्तक्षेप केला आणि सामना पुन्हा सुरळीत सुरु झाला.

पण असे असले तरी या वादानंतर गिलला मोठी खेळी करता आली नाही. त्याला नंतर सिमरजीत सिंगने 23 धावांवर बाद केले.

नंतर पंजाबकडून गुरकिरत सिंग मन(65) आणि कर्धार मंदिप सिंगने(81) अर्धशतकी खेळी केली. तर अनमोलप्रीत सिंगने 45 धावांची खेळी केली. यांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने आज पहिल्या दिवसाखेर 8 बाद 266 धावा केल्या.

https://twitter.com/Maha_Sports/status/1213071698569900033

https://twitter.com/Maha_Sports/status/1213049913040195584

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---