इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा युवा फलंदाज शुभमन गिलने मोठे विधान केले आहे. गिलने म्हटले आहे की, जर त्याला संधी मिळाली तर तो नक्कीच केकेआरकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरेल. गिलने त्याचे लक्ष फक्त संघासाठी जास्तीत जास्त धावा करणे आणि संघाला ट्रॉफी जिंकून देण्यावर असल्याचे सांगितले. Shubman Gil Talks About His Opening Position In KKR
पीटीआयशी बोलताना गिल म्हणाला की, “जर मला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच ही संधी दवडणार नाही. मला नाही वाटत की, लोकांच्या अपेक्षांमुळे माझ्यावर कसल्याही प्रकारचा दवाब पडतो. कारण मी जेव्हाही फलंदाजी करण्यासाठी मैदानावर जातो, तेव्हा माझे सर्व लक्ष फक्त जास्तीत जास्त धावा करण्यावर असते. माझा एकमेव उद्देश, माझ्या संघासाठी खेळणे आणि संघाला विजेता बनवणे हा आहे.”
आपणा सर्वांना माहिती आहे की, आयपीएलचा तेरावा हंगाम कोरोना व्हायरसमुळे युएईत आयोजण्यात आला आहे. युएईतील मैदाने फिरकीपटूंसाठी सोईची आहेत. याविषयी बोलताना गिल म्हणाला की, “भारतात आम्ही बऱ्याचदा स्लो खेळपट्टी असणाऱ्या मैदानांवर खेळलो आहोत. तुम्हाला केवळ येथील परिस्थितीनुसार स्वत:ला तयार करायचे आहे. मला स्वत:वर पूर्ण विश्वास आहे की, मी कोणत्याही परिस्थितीत चांगले प्रदर्शन करु शकतो.”
आयपीएल २०२०ची सुरुवात १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याने होणार आहे. तर, केकेआरचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध २३ सप्टेंबरला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सराव करताना धोनीने मारलेला षटकार पाहून मुरली विजय झाला दंग; बोलती झाली बंद
-सीएसके संघात रैनाच्या जागी ‘हा’ असेल आदर्श खेळाडू; दिग्गजाने दिला पर्याय
-१५-२० नाही तर तब्बल ४५ खेळाडूंसह न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार हा संघ
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी कार्तिक निवडेल ‘या’ ११ शिलेदारांना
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?
–अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट