टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल आज (8 सप्टेंबर) आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा 1999 साली पंजाबमधील फाजिल्का शहरात जन्म झाला होता.
लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या शुबमन गिलचे पहिले प्रशिक्षक त्याचे वडील लखविंदर सिंग होते. ते त्याला शेतात सराव करायला लावायचे. ते शेतात चटई टाकून शुबमनला गोलंदाजी करायचे. आज शुबमनच्या वाढदिवशी आपण त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
शुभमन गिलनं एवढ्या लहान वयात कमावलेली प्रसिद्धी आणि संपत्ती वाखाणण्याजोगी आहे. जर आपण शुबमनच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर, ती सुमारे 32 कोटी रुपये आहे. बीसीसीआयचा करार आणि ब्रँड प्रमोशन हे गिलचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. शुबमन गिल प्रमोशनच्या माध्यमातून करोडोंची कमाई करतो.
शुबमन गिलला बीसीसीआयच्या 2024 च्या करारात बढती मिळाली होती. त्याचा बीसीसीआयच्या ग्रेड ‘ए’ श्रेणीत समावेश करण्यात आला. या श्रेणीतील क्रिकेटपटूंना वार्षिक 7 कोटी रुपये पगार मिळतो. याशिवाय गुजरात टायटन्सनं त्याला 8 कोटी रुपयांना करारबद्ध केलं आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी गिलला 3 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळते.
शुबमन गिल अनेक मोठ्या ब्रँड्सचं प्रमोशन करतो. यामध्ये टाटा कॅपिटल, सिएट, भारत पे, माय 11 सर्कल सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. शुबमन गिलकडे अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत. त्याचं पंजाबमधील फिरोजपूरमध्ये आलिशान घर आहे. याशिवाय भारतातील अनेक भागांमध्ये त्याच्या मालमत्ता आहेत. मात्र या मालमत्तांची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही.
शुबमन गिलला कारची फार आवड आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर एसयूव्हीसह महिंद्रा थार या महागड्या कार आहेत. याशिवाय त्याच्या गॅरेजमध्ये इतर वाहनांचाही समावेश आहे.
हेही वाचा –
गणपती बाप्पा मोरया! बांगलादेशच्या क्रिकेटपटूनं साजरी केली गणेश चतुर्थी, फोटो व्हायरल
विराट कोहलीला 10 वेळा बाद करणाऱ्या दिग्गज फिरकीपटूची अचानक निवृत्ती
काय सांगता! वेगवान गोलंदाज अचानक बनला स्पिनर, खेळाडू-कोच कोणाचाच विश्वास बसेना