इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम जरी अनिश्चित काळासाठी स्थगित झाला आहे. असे असले तरी या हंगामादरम्यानचे खेळाडूंचे काही मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणाची पत्नी साची मारवाह हिने एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये साची आणि नितीशबरोबर शुबमन गिल आणि कमलेश नागरकोटी हे केकेआरचे खेळाडू वेगळ्याच अंदाजात डान्स करताना दिसत आहेत. ते एका डान्स स्टेपचा सराव करत असल्याचे या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. तसेच हे खेळाडू यादरम्यान एकमेकांना पाहून हसतानाही दिसत आहेत. या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगली पंसती मिळत असून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.
नितीश, गिल आणि नागरकोटी हे केकेआरकडून एकत्र खेळतात. तसेच एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत.
https://www.instagram.com/p/CO5P3_8Hm0f/
नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्थगित झालेल्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात नितीशची कामगिरी चांगली झाली. त्याने ७ सामन्यात २ अर्धशतकांसह २०१ धावा केल्या. मात्र, गिलची बॅट फारशी बोलली नाही. त्याला ७ सामन्यात केवळ १३२ धावा केल्या. तर नागरकोटीने या हंगामात एकच सामना खेळला. मात्र, त्याला एकही विकेट घेण्यात यश आले नाही.
शुबमन गिलला मिळाली इंग्लंड दौऱ्यासाठी संधी
आयपीएल २०२१ मध्ये जरी चांगली कामगिरी करता आली नसली तरी शुबमन गिलला भारताच्या कसोटी संघातील स्थान कायम राखण्यात यश आले आहे. अगामी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेता अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीवर टीका करणार्या वॉनला पाकिस्तानी खेळाडूची चपराक, म्हणाला “एकही वनडे शतक मारू न शकणार्यांनी…”
आयपीएल २०२१: मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने मोडले सारे उच्चांक, वाचा सविस्तर
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज






