---Advertisement---

इंदोर कसोटीसाठी टीम इंडियात होणार बदल? प्रदीर्घ काळानंतर ‘या’ दोघांना मिळणार संधी

On: मंगळवार, फेब्रुवारी 28, 2023 11:13 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (दि. 1 मार्च) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मधील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. इंदोर येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघामध्ये दोन बदल होण्याची दाट शक्यता आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुल याच्या जागी युवा शुबमन गिल संघात येऊ शकतो.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. दोन्ही सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर एकतर्फी हुकूमत गाजवत प्रत्येकी तीन दिवसात दोन्ही सामन्यांचा निकाल लावला. तिसरी कसोटी जिंकून जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वलस्थानी पोहोचू शकतो. तसेच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील भारतीय संघाची जागा देखील पक्की होईल. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ दोन बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

एका आघाडीच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इंदोर येथील सामन्यात भारतीय संघात शुबमन गिल व उमेश यादव यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गिल खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुल याच्या जागी सलामीला फलंदाजी करेल. राहुल मागील बऱ्याच कालावधीपासून सातत्याने अपयशी ठरत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही त्याला आपली छाप पाडण्यात यश आले नाही.

तर, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या जागी उमेश यादव संघात खेळताना दिसू शकतो. शमी याला वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी विश्रांती देण्यात येणार आहे. शमीने पहिल्या दोन सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली होती. गिल व उमेश आपला अखेरचा कसोटी सामना बांगलादेश दौऱ्यावर खेळले होते.

इंदोर कसोटीसाठी संभाव्य भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव व मोहम्मद सिराज.

(Shubman Gill And Umesh Yadav Might Play Indore Test Rahul And Shami Will Rested)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोर कसोटीत विराट करणार खास क्लबमध्ये एन्ट्री! यापूर्वी भारताकडून फक्त द्रविडच मानकरी 
बुमराहचे पुनरागमन सप्टेंबरपर्यंत लांबणार! कारकीर्दीविषयी आता बीसीसीआय घेणार कठोर निर्णय 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---