भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथा टी-20 सामना शनिवारी (12 ऑगस्ट) फ्लोरिडामध्ये खेळला गेला. भारतीय संघाचे युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल व शुबमन गिल यांनी यजमान संघाच्या गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवत भारताला 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. यासह भारताने मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. यासह या जोडीने एक मोठा विक्रम आपल्या नावे नोंद केला.
भारतीय संघासमोर या सामन्यात विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाला हे आव्हान काहीसे जड जाईल असे वाटत असताना जयस्वाल व गिल या जोडीने शानदार फटकेबाजी करत यजमान संघाला सामन्यातून बाहेर केले. आधी दोघांनी शतकी भागीदारी केली तर त्यानंतर आणखी पुढे जात 150 पेक्षा जास्त धावा केल्या. विजयासाठी केवळ 14 धावांची गरज असताना गिल बाद झाला. मात्र, तोपर्यंत त्यांनी भारतीय क्रिकेटमधील एक मोठा पराक्रम नोंदवला होता.
जयस्वाल व गिल यांनी केलेल्या 165 धावा या भारतीय टी20 सलामीवीरांनी दिलेली सर्वोत्तम सलामी आहे. या दोघांनी यावेळी रोहित शर्मा व केएल राहुल यांची बरोबरी केली. त्यांनी 2018 मध्ये इंदोर येथे श्रीलंकेविरुद्ध 165 धावा केल्या होत्या. तर रोहित व शिखर या जोडीने डब्लिन येथे 160 धावा केल्या होत्या. तर, रोहित आणि शिखर यांनीच न्यूझीलंडविरुद्ध 158 धावांची सलामी देखील दिली होती.
या सामन्यात जयस्वाल याने अखेरपर्यंत नाबाद राहत 51 चेंडूवर 84 धावा केल्या. तर, गिल 47 चेंडू 77 धावा करून बाद झाला. आता मालिकेतील अखेरचा सामना रविवारी खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिका आपल्या नावे करेल.
(Shubman Gill And Yashasvi Jaiswal Equal Highest Opening Partnership For India In T20I)
महत्वाच्या बातम्या –
शफाली वर्मासह विमानतळावर गैरवर्तन! ट्विटरवर सांगितली आपबिती, वाचा संपूर्ण प्रकरण
यष्टीरक्षक सॅमनससह कुलदीपने दाखवली चपळाई, टीम इंडियासाठी घेतले दोन जबरदस्त कॅच