वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसरा टी20 सामना मंगळवारी (8 ऑगस्ट) गयानामध्ये खेळला गेला. चांगल्या सुरुवातीनंतर कर्णधार रॉवमन पॉवेल याने केलेल्या फटकेबाजीमुळे यजमान संघाने निर्धारित 20 षटकात 159 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शुबमन हा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या टी20 संघातील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहिल्या दोन सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघासमोर विजयासाठी 160 धावांचे आव्हान असताना, यशस्वी जयस्वाल व शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. मात्र, जयस्वाल डावाच्या चौथ्याच चेंडूवर बाद झाला. गिलकडून अपेक्षा असताना 11 चेंडूवर केवळ 6 धावा करत तो तंबूत परतला.
गिल याने नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात 700 पेक्षा जास्त धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती. मात्र, भारतीय संघासाठी आत्तापर्यंत केवळ एक सामना सोडला तर तो फारसे योगदान देऊ शकला नाही. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत केवळ 9 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी न्यूझीलंडविरुद्धच्या एकाच सामन्यात त्याने 63 चेंडूंवर 126 धावांची खेळी केली होती..
याव्यतिरिक्त तो अर्धशतक देखील झळकावू शकला नाही. विशेष म्हणजे यामध्ये सहा सामन्यात तो एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. त्याने या 9 सामन्यांमध्ये केवळ 218 धावा केल्या असून, यादरम्यान त्याची सरासरी 24.28 अशी सामान्य राहिली आहे.
वनडे व टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा प्रमुख सलामीवीर म्हणून त्याने आपली जागा बनवली असली तरी, टी20 क्रिकेटमध्ये त्याला अजून स्वतःला सिद्ध करावे लागेल.
(Shubman Gill Another Failure In T20I Against West Indies)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघात खळबळ! दिग्गज खेळाडूने संघाशी तोडला संबंध, अमेरिकडून मिळाली ऑफर
‘आम्ही दोन दिवसात…’, विश्वचषक तयारीविषयी भारतीय कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया