दुलीप ट्रॉफी 2024 चा (Duleep Trophy 2024) पहिला सामना भारत अ आणि इंडिया ब यांच्यात बंगळुरू येथे खेळला जात आहे. भारत अ संघाचा कर्णधार शुभमन गिल आहे. त्याच्या सामन्याशी संबंधित एक मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान गिल अंपायरशी फलंदाजीबाबत बोलताना दिसला. गिलकडे बघून तो पंचांशी शॉट खेळण्याच्या पद्धतीबद्दल बोलतोय असे वाटते. टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. गिलच्या संघात कुलदीप यादव, शिवम दुबे आणि आवेश खान यांचाही समावेश आहे.
खरे तर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत अ ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारत ब चे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आले. भारत ब संघाने पहिल्या दिवसाखेर 7 गडी गमावून 202 धावा केल्या होत्या. या सामन्यादरम्यान एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. कर्णधार शुभमन पंचांशी फलंदाजीबद्दल बोलताना दिसला. हा व्हिडिओ X वर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये गिलला पाहता तो पंचांना कोणत्या तरी शॉटबद्दल समजावून सांगत असल्याचे दिसते.
Shubman taking class to umpire on how the batter didn’t offered the shot😌🤭#ShubmanGill pic.twitter.com/zTAi8iEZHS
— shubiworld (@shublove77) September 5, 2024
टीम इंडियाचे अनेक वरिष्ठ खेळाडू दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये खेळत आहेत. टीम इंडियाला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या कारणास्तव दुलीप ट्रॉफी खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची आहे. बीसीसीआयची निवड समिती दुलीप ट्रॉफीतील खेळाडूंची कामगिरी पाहूनच संघाची निवड करेल. त्यामुळे खेळाडूही भारतीय संघातील त्यांचा दावा मजबूत करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
भारत अ आणि भारत ब यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत काही विशेष करू शकले नाहीत. हे दोन्ही खेळाडू भारत ब संघाचा भाग आहेत. यशस्वी 30 आणि पंत 7 धावा करून बाद झाला. मात्र सरफराज खानचा भाऊ मुशीर खानने दुलीप ट्रॉफीचा पहिला दिवस गाजवला. त्याने दिवस संपेपर्यंत 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 105 धावा केल्या.
हेही वाचा –
प्रशिक्षक गंभीरने भारतीय संघाला दिलाय निर्भयपणे क्रिकेट खेळण्याचा ‘गुरुमंत्र’, जयस्वालचा खुलासा
इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार, दुसऱ्या देशात खेळली जाऊ शकते मालिका; काय आहे कारण?
भारतीय वंशाच्या स्टार क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये लढतोय आयुष्याची लढाई