---Advertisement---

आयपीएल 2023चा ऑरेज कॅप होल्डर बनला शुबमन गिल! आरसीबी कर्णधार पडला मागे

Shubman Gill
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल यावर्षी आयपीएलमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत आला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023चा दुसरा क्वॉलिफायर सामना शुक्रवारी (26 मे) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. शुबमन गिलने या सामन्यात 9 धावा करताच आपल्या नावावर मोठा विक्रम केला.

आयपीएल 2023मध्ये शुबमन गिल (Shubman Gill) याने आतापर्यंत दोन शतके ठोकली आहेत आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. शुक्रवारी गिने हंगामात सर्वाधिक आयपीएल धावांच्या बाबतीत फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याला मागे सोडले. शुबमन गिलने यावर्षी हंगामातील पहिल्या 15 सामन्यांमध्ये 722 धावा केल्या होत्या. शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या 9 धावा पूर्ण करताच तो हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.

तसे पाहिले तर फाफ डू प्लेसिस यावर्षी ऑरेंज कॅपचा मानकरी ठरू शकत होता. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्लेऑफमध्ये पोहोच न शकल्याने फाफ ऑरेंज कॅफच्या शर्यतीत मागे पडला. सध्या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये शुबमन गिल पहिल्या, फाफ डू प्लेसिस दुसऱ्या, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.  (Shubman Gill became the Orage cap holder of IPL 2023!)

आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
शुबमन गिल (गुजरात टायटन्स) – 731*
फाफ डू प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – 730
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – 639
डेवॉन कॉनवे (चेन्नई सुपर किंग्ज) – 625
यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स) – 625

दरम्यान, मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर शुमबन गिलच यावर्षी ऑरेंज कॅपचा मानकरी ठरणार, असे दिसते. कारण यादीत फक्त डेवॉन कॉनवे आहे, ज्याला अजून एक सामना खेळायचा आहे. या एका सामन्यात कॉनवे 100 पेक्षा अधिक धावांचे अंतर भरून काढेल, हे जवळपास अशक्यच आहे. अशात यावर्षी ऑरेंज कॅफ शुबमन गिलकडेच राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल क्लोजिंग सेरेमनी । रॅपर किंग-डिवाइनसह हे मोठे कलाकार लावणार हजेरी
ब्रेकिंग! मुंबई विरुद्ध गुजरात सामना रद्द? गुजरात थेट फायनलमध्ये पोहोचणार, वाचा धक्कादायक माहिती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---