---Advertisement---

कॅप्टन गिल वनडे रँकिंगमध्ये नंबर-1 स्थानावर विराजमान! टॉप-5 मध्ये 3 भारतीय खेळाडूंचा समावेश

On: बुधवार, जुलै 29, 2026 6:36 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिलची (Shubman gill) गेल्या एक वर्षापासून दोन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे.

इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला 2-1 ने पराभव पत्करावा लागला असला, तरी गिलची फलंदाजी खूप शानदार झाली होती. या मालिकेतील शेवटचा सामना 19 जुलै रोजी खेळवला गेला होता. त्यानंतर 22 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत गिल दुसऱ्या स्थानावर होता. पण आता कोणताही सामना न खेळताच त्याला फायदा मिळाला असून, शुबमन गिल आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत थेट नंबर-1 च्या स्थानावर पोहोचला आहे.

त्याने न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला (Dryl mitchell) मागे टाकून ही पहिली स्थान पटकावले आहे. सध्या वनडे क्रमवारीत टॉप-5 खेळाडूंमध्ये 3 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. डॅरिल मिचेल सामने न खेळल्यामुळे शुबमन गिलला आयसीसीच्या ताज्या वनडे फलंदाजी क्रमवारीत नंबर-1 बनण्याचा फायदा मिळाला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामन्यांमध्ये मिचेल खेळला नव्हता. त्यामुळे आधी 802 रेटिंग गुणांसह नंबर-1 वर असलेला डॅरिल मिचेल आता 794 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. याचा थेट फायदा शुबमन गिलला झाला आणि तो 801 रेटिंग गुणांसह नंबर-1 बनला आहे.

याशिवाय, टॉप-5 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) 767 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानी, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) 758 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहेत. आता भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली पुढील मालिका कसोटी फॉरमॅटमध्ये खेळायची आहे, जी 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची असणार आहे. (Test Series between IND vs SL)

या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलकडे आपली कसोटी रँकिंग सुधारण्याची उत्तम संधी असेल, जिथे तो सध्या 743 रेटिंग गुणांसह 7व्या क्रमांकावर आहे. तसेच कसोटीच्या टॉप-10 मध्ये दुसरा भारतीय खेळाडू यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) आहे, जो 733 रेटिंग गुणांसह 9व्या स्थानावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---