अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स आमने-सामने होते. या सामन्यात शुबमन गिल हा वेगाने धावा करत होता. मात्र, चपळाईसाठी ओळखला जाणारा एमएस धोनी गिलसाठी धोका ठरला. धोनीने गिलला मैदानावर जास्त वेळ टिकूच दिले नाही. गिल बाद झाला असला, तरीही त्याने या हंगामात खास विक्रम नावावर केले. मात्र, तो विराट कोहली याचा विक्रम मोडण्यात अपयशी ठरला.
झाले असे की, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरात टायटन्स संघाकडून शुबमन गिल (Shubman Gill) आणि वृद्धिमान साहा यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी गिल आणि साहा दोघेही चांगल्या लयीत धावा कुटत होते. मात्र, पॉवरप्ले संपताच सातव्या षटकात गिलला आपली विकेट गमवावी लागली. रवींद्र जडेजा याने सातव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर गिलला तंबूत पाठवलं. जडेजाने टाकलेला चेंडू खेळण्यास गिल चुकला आणि तो क्रीझच्या बाहेर आला. यावेळी क्षणाचाही विलंब न करता धोनीने त्याला यष्टीचीत केले आणि तंबूचा रस्ता दाखवला.
यावेळी गिलने 20 चेंडूत 39 धावा केल्या. या धावा करताना त्याने 7 चौकार मारले. यासह त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवले गेले. त्यातील पहिला विक्रम म्हणजे सर्वाधिक धावांचा.
1. हंगामातील सर्वाधिक धावा
शुबमन गिल आयपीएल 2023 हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने 17 सामने खेळताना 59.33च्या सरासरीने आणि 157.80च्या सरासरीने सर्वाधिक 890 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 शतकेही झळकावली. तसेच, 4 अर्धशतकांचाही पाऊस पाडला. 129 ही त्याची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
2. आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा 30हून अधिक धावा
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा 30हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये गिलने अव्वल क्रमांक पटकावला. त्याने आयपीएल 2023मध्ये 13 वेळा 30हून अधिक धावा केल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी विराट कोहली असून त्याने 2016मध्ये 12 वेळा 30हून अधिक धावा केल्या होत्या. तसेच, विराटसोबत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी असलेल्या केन विलियम्सन यानेही 2018मध्ये 12 वेळा 30हून अधिक धावा केल्या होत्या.
3. हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज
शुबमन गिल अंतिम सामन्यात 39 धावांची खेळी साकारत हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याच्या 890 धावा झाल्या आहेत. तो एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला. या यादीत अव्वलस्थानी विराट कोहली (Virat Kohli) असून त्याने 2016मध्ये सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या. (shubman gill create record in gt vs csk ipl 2023 final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा