भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करत त्याने चांगली कामगिरी केली होती. तसेच आयपीएल २०२१ ही स्पर्धा येत्या ९ एप्रिल पासून सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघ देखील कसून सराव करत आहे. या संघाकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या शुबमन गिलचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर चाहत्याने केलेल्या कमेंटवर गिलने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पहिला सामना ११ एप्रिल रोजी सनरायजर्स संघासोबत रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्हीही संघ मैदानात कसून मेहनत करत आहेत. यंदाही शुबमन गिल कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे. या सामन्यापूर्वी गिलचा केकेआरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता.
ज्यावर एका चाहत्याने त्याची मजा घेत लिहिले की, “काय टूक टूक आहे”. गिलने आयपीएल २०२० मध्ये ११७.९६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. त्यामुळे चाहत्याने अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर गिलने चोख प्रत्युत्तर देत लिहिले की, “मी तिथेच आहे जिथे मला ‘मिस्टर नोबडी’ बनायचे आहे.”
आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत गिलने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी डावाची सुरुवात करताना एकूण ४४० धावा केल्या होत्या. त्याने पहिल्यांदाच आयपीएलच्या एका हंगामात ३०० धावांचा आकडा पार केला होता. यापूर्वी त्याने २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत २९६ आणि २०३ धावा केल्या होत्या.
तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल २०२० स्पर्धेत प्लेऑफ गाठण्यास अपयश आले होते. त्यांना ५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. तसेच येणाऱ्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोईन अली क्रिकेट खेळत नसता तर अतिरेकी बनला असता, तस्लीमा नसरीन यांचे वादग्रस्त विधान
आयपीएल २०२१: सर्वाधिक धावांसाठी ‘या’ चार खेळाडूंमध्ये रंगणार स्पर्धा, विराट आहे बराच पुढे
आयपीएलवरही झाला कोरोना इफेक्ट; बक्षीस रक्कमेत झाली ‘एवढी’ घट