रविवार (7 मे) आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात सामन्यात यजमान गुजरात टायटन्सकडून लखनऊ सुपरजायंट्सला 56 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गुजरातच्या या विजयात त्यांचे दोन्ही सलामीवीर शुबमन गिल व वृद्धिमान साहा यांचा सिंहाचा वाटा राहिला. शुबमन गिल हा शतक झळकवण्यापासून वंचित राहिला असला तरी, नरेंद्र मोदी स्टेडियमवरील त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.
शुबमन गिल याने लखनऊविरुद्ध या सामन्यात संघाला वेगवान सुरुवात दिली. गिलसह त्याने पहिल्या गड्यासाठी 12.1 षटकात 142 धावा कुटल्या. गिलने अखेरपर्यंत नाबाद राहत 51 चेंडूवर 2 चौकार व 7षटकारांच्या मदतीने 94 धावा फटकावल्या. या संपूर्ण हंगामातील त्याची आतापर्यंतची कामगिरी पाहिल्यास त्याचा फॉर्म दिसून येतो. त्याने 11 सामन्यात 469 धावा केल्या असून, संघाला तो सातत्याने चांगली सुरुवात देण्यात यशस्वी ठरला आहे.
गिल 2023 या वर्षात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अक्षरशः धावांचा पाऊस पाडताना दिसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याची बॅट चांगलीच बोलली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत त्याने 124 धावांची खेळी केली होती. तर, न्यूझीलंडविरुद्ध टी20 मध्ये त्याने 126 धावांची नाबाद खेळी केलेली.
यावर्षी आयपीएलमध्ये आपल्या घरच्या मैदानावर खेळताना देखील त्याचा हा फॉर्म दिसून आला. त्याने या हंगामात नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनुक्रमे 63, 39, 45, 56, 6 व नाबाद 94 अशा धावा केल्या आहेत. घरच्या मैदानावर गुजरातला आणखी दोन सामने खेळायचे असून, यामध्ये तो हीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. तसेच, आयपीएल 2023 चा अंतिम सामना याच मैदानावर होणार असल्याने गुजरातला सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावण्याची संधी राहील.
(Shubman Gill Excellent Record At Narendra Modi Stadium At Ahmedabad In 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लेगस्पिन ग्रॅंडमास्टर’ चहलने केली ब्राव्होची बरोबरी! आयपीएलमध्ये इतिहास रचण्यापासून केवळ एक विकेट दूर
याला म्हणतात इम्पॅक्ट! अवघ्या 7 चेंडूवर फिलिप्सने हिसकावला रॉयल्सच्या तोंडून विजयाचा घास! पठ्ठ्या बनला थेट सामनावीर