---Advertisement---

पहिली वर्ल्डकप मॅच खेळण्याआधी शुबमन गिल पडला आजारी, प्लेइंग इलेव्हनविषयी महत्वाची माहिती आली समोर

Team India (ODI vs AUS)
---Advertisement---

वनेड विश्वचषक 2023 मधील पहिला सामना जयमान भारतीय संघाला रविवारी (8 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियासोबत खेळायचा आहे. उभय संघांतील हा सामना चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याच्या फिटनेसबाबत मोठी माहिती समोर येत आहेत. आजारपणामुळे गिल सुरुवातीच्या काही सामन्यातून माघार घेऊ शकतो.

क्रिकबझच्या माहीतीनुसार शुबमन गिल वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) मधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नाहीये. भारताला आपला पहिला सामना ऑस्ट्रेलिया, तर दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 11 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. माहितीनुसार शुबमन गिल याला डेंग्यू झाला असून याच कारणास्तव तो या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. भारतीय संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली आहे की, “शुबमन गिलला बरे वाटत नाहीये. मेडियल टीम त्याच्यावर नजर ठेवून आहे. गिल लवकर बरा होईल, अशी आम्ही आशा व्यक्त करत आहोत.”

दरम्यान, शुबमन गिल (Shubman Gill) ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही, तर सलामीवीरांबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याविषयी माहिती अशी आहे की, विश्वचषकातील या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या ईशान किशन (Ishan Kishan) याची साथ मिळू शकते. तसेच संघ व्यवस्थापन रविचंद्रन अस्विन, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या तीन फिरकीपटूंसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळू शकतो. मायदेशातील खेळटपट्टीवर भारतीय संघासाठी हे तिन्ही फिरकीपटू महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.  (Shubman Gill fell ill before the match against Australia and important information about India’s playing eleven has come to light)

वनडे विश्चषकासाठी निवडलेला भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.

महत्वाच्या बातम्या – 
चीनच्या भूमीत 20 वर्षीय तिलकने मोडला रोहितचा विक्रम, खेळली टी20 करिअरची सर्वोत्तम Inning
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिरडत अफगाणिस्तानचा जबरदस्त विजय, अंतिम सामन्यात ऋतुराजसेनेशी भिडणार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---