भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL)यांच्यात मंगळवारी (10 जानेवारी) मालिकेतील पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यासाठी भारताने जेव्हा अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहीर केली,तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मागील वनडे सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या ईशान किशनला बाकावर बसवून शुबमन गिलला संधी देण्यात आली. यावरून सोशल मीडियावर वादाला सुरूवात झाली. गिलला का घेतले असा प्रश्न चाहत्यांनी विचारला, मात्र गिलनेही त्यांना नाराज न करता जबरदस्त सुरूवात करत अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने मोठा विक्रमही नोंदवला.
शुबमन गिल (Shubman Gill) याने 2019मध्ये भारताच्या वनडे संघात पदार्पण केले आणि पहिल्या 16 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय हा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत 60 चेंडूत 11 चौकारांच्या सहाय्याने 70 धावा केल्या. याबरोबरच त्याच्या 757 धावा पूर्ण झाल्या. हा विक्रम करताना त्याने श्रेयस अय्यर (748), नवजोत सिंग सिद्धू (725) आणि विराट कोहली (655) यांना मागे टाकले आहे.
सूर्यकुमार यादव आणि किशन यांना वगळून गिलला संघात घेतले, हा निर्णय चुकीचा ठरेल असे चाहते म्हणत होते. त्याला गिलने चांगली खेळी करत प्रत्युत्तर दिले. किशनप्रमाणे सूर्यकुमारनेही मागील टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती, मात्र अय्यरने फॉर्ममध्ये सातत्य राखत तो चौथ्या क्रमांकासाठी योग्य आहे, हे सिद्ध केले आहे. यामुळे गिल पहिल्या वनडेत सलामीला येणार हे रोहितने सांगितले होते.
गिलने त्याच्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत एक शतकही केले आहे. तसेच 5 अर्धशतकेही केली असून त्याची सरासरी 58.23 आहे. 16 डावातच त्याची ही कामगिरी पाहून त्याने वनडेसाठी चांगली सुरूवात केली असल्याचे दिसून येते.
यावर्षी भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून या वनडे मालिकेकडे पाहिले जात आहे. तसेच भारताकडे सलामीसाठी अनेक पर्याय असल्याने विश्वचषक संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी सगळेच खेळाडू चांगली कामगिरी करण्यावर भर देत आहेत. (Shubman Gill Fifty and Most runs for India After 16 ODI Innings INDvSL 1st ODI)
पहिल्या 16 डावांनतर सर्वाधिक धावा करणारे (भारतासाठी)-
757 – शुबमन गिल
748 – श्रेयस अय्यर
725 – नवजोत सिद्धू
655 – विराट कोहली
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच वनडेत कॅप्टन रोहितची धमाकेदार खेळी, गाठला 9500 धावांचा टप्पा
पृथ्वी शॉचे झंझावाती शतक, वादळी खेळी करत बीसीसीआयच्या निवड समितीला फटकारले!