भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड वर सुरू होणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ मेलबर्न येथून सिडनी येथे रवाना झाला आहे. सिडनीच पोहोचताच भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने ट्विटर अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला. या फोटोवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट करत गिलला पुन्हा जेवणासाठी हॉटेलला न जाण्याचा सल्ला दिला आहे.
Bhai run bana lena please .. phir bahar dinner karne mat chale jaana
— indian ( Wear Mask and vaccinate) (@geekydevil07) January 4, 2021
दरम्यान गिलला असे सल्ले मिळण्याचे कारण सर्वश्रुत आहे. मेलबर्न येथील दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्मा, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, रिषभ पंत व नवदीप सैनी एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथे नवलदीप सिंग नामक एका भारतीय चाहत्याने या खेळाडूंचे हॉटेल बिल त्यांना न सांगताच भरले. नवलदिप सिंगने हा सर्व प्रसंग आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला.
त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने भारतीय खेळाडूंनी कोरोना प्रोटोकॉल मोडल्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . मात्र आता ही सर्व चर्चा थांबली असून सर्व खेळाडूंना तिसरा कसोटी सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मालिकेतील तिसरा सामना सिडनी येथे 7 जानेवारीपासून होणार आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर आत्मविश्वाने भरलेल्या भारतीय संघाकडून सर्व क्रिकेट चाहत्यांना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. शुभमन गिलने देखील पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. गिलने पहिल्या डावात 45 तर दुसर्या डावात नाबाद 35 धावांची खेळी केली होती. सिडनी येथील सामन्यातही गिलकडून अशाच उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीत शुन्यावर बाद होणं महापाप! ‘या’ तीन आशियायी फलंदाजांनी तर सलग तीन डावात केलंय हे काम
धक्कादायक! आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावू इच्छित होती एक व्यक्ती, भारतीय खेळाडूशी साधला होता संपर्क
वाढदिवस विशेष : परदेशात भारतीय संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार






