भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील पर्थच्या मैदानावर सराव करत आहे. दरम्यान भारताचा स्टार खेळाडू शुबमन गिलला (Shubman Gill) दुखापत झाली आहे. त्यामुळे तो मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण गिलच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळू शकते, हे जाणून घेऊया.
वास्तविक शुबमन गिल (Shubman Gill) पर्थ कसोटीपूर्वी सराव करत होता. त्याच्यासोबत भारतीय संघाचे इतर खेळाडूही उपस्थित होते. शनिवारी (16 नोव्हेंबर) झेल घेताना गिल जखमी झाला. यानंतर तो मैदानातून निघून गेला आणि परत आलाच नाही. शुबमनला स्कॅनिंगसाठी रुग्णालयात नेण्यात आले. टाईम्स इंडियाच्या एका बातमीनुसार, गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे तो पर्थ कसोटीतून बाहेर पडू शकतो.
शुबमनच्या गिलच्या (Shubman Gill) अनुपस्थितीत भारतीय संघ युवा खेळाडू अभिमन्यू ईश्वरनला (Abhimanyu Easwaran) संधी देऊ शकतो.
भारतीय संघासाठी कसोटीत गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. पर्थ कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त नसेल तर अभिमन्यू ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळू शकते. तो सध्या ऑस्ट्रेलियात असून भारत अ संघाचा भाग आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिमन्यूचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. पण तो अद्याप भारताकडून खेळू शकला नाही. त्याने 101 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7,674 धावा केल्या आहेत. तर 88 लिस्ट ए सामन्यांमध्ये 47.49च्या सरासरीने 3,847 धावा केल्या आहेत.
बॉर्डर गावसकर मालिकेचं पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs PAK; ऑस्ट्रेलियाने घेतला बदला! पाकिस्तानचा 2-0 ने उडवला धुव्वा
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी ऑस्ट्रेलियाला कधी रवाना होणार रोहित शर्मा?
मेगा लिलावासाठी आरसीबीच्या सर्व योजना तयार! प्रशिक्षक बनवणार मजबूत संघ