भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सलामीला फलंदाजीला आलेल्या युवा शुबमन गिल याने आपला शानदार फॉर्म कायम राखला. त्याने उत्कृष्ट फलंदाजीचा नजारा सादर करत आपल्या वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले.
Back-to-back ODI tons for Shubman Gill 👏#INDvNZ | 📝: https://t.co/raJtMjMaEn pic.twitter.com/yXkSO6lYX6
— ICC (@ICC) January 18, 2023
रोहित शर्मा याच्यासह सलामीला आलेल्या शुबमन गिलने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवले. त्याने लवकरच आपल्या अर्धशतकाला गवसणी घातली. भारताचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाले असताना त्याने सूर्यकुमार यादवसह शानदार भागीदारी रचली. तिसाव्या षटकात केवळ 87 चेंडूंवर त्याने आपले शतक पूर्ण केले. यामध्ये 14 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. हे त्याचे सलग दुसऱ्या सामन्यातील शतक ठरले. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्याने 116 धावांची खेळी केली होती.
बातमी अपडेट होत आहे…
(Shubman Gill Hits 3rd ODI Century In Hyderabad ODI Against Newzealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉसचा निकाल भारताच्या पारड्यात! दोन धुरंधरांचे पुनरागमन, तर ईशानचाही ताफ्यात समावेश
सरफराजने शतक ठोकल्यानंतर ‘सिद्धू मूसेवाला’च्या अंदाजात केले सेलिब्रेशन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध