चार मार्चपासून भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान होणार्या चौथ्या कसोटीत युवा सलामीवीर शुबमन गिलला दमदार कामगिरी करावी लागेल. ही त्याची शेवटची संधी आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांच्या ६ डावात त्याने फक्त एक अर्धशतक ठोकले आहे. दुसरीकडे मयंक अगरवालने घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने पुढे आहे. अहमदाबाद येथे होणारी चौथी कसोटी भारतीय संघासाठीही महत्त्वाची आहे.
भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जाण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल किंवा अनिर्णित ठेवावा लागेल. न्यूझीलंड संघाने यापूर्वीच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
फ्लॉप ठरत आहे गिल
गिलने मालिकेत चांगली सुरुवात केली होती. त्याने चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २९ तर दुसर्या डावात ५० धावा केल्या होत्या. कर्णधार विराट कोहलीनेही या खेळीचे कौतुक केलेले. मात्र, भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला होता. यानंतर, पुढच्या चार डावांमध्ये शुबमनला फार काही करता आले नाही. चेन्नईतील दुसर्या कसोटीत त्याला केवळ ० आणि १४ धावा करता आल्या. गिल मोटेरामधील तिसर्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा फ्लॉप झाला.
या दिवस-रात्र कसोटीच्या पहिल्या डावात जोफ्रा आर्चरच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंवर तो बाद झाला. तर, दुसऱ्या डावात तो १५ धावा करून नाबाद राहिला. तो चार डावात वेगवान गोलंदाजांविरुद्ध बाद झाला आहे. याआधी, गिलने ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या सहा डावांमध्ये चांगली कामगिरी केली होती. या दरम्यान त्याने ४५, ३५, ५०, ३१, ७ आणि ९१ धावा केल्या. म्हणजेच, त्याने प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात केली. ज्यात दोन अर्धशतके ठोकली आणि तीन डावांमध्ये ३० पेक्षा जास्त धावा केल्या. कसोटी कारकीर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, गिलने ६ कसोटीत ३८ च्या सरासरीने ३७८ धावा केल्या.
मयंकच्या रूपाने आहे सक्षम पर्याय
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात मयंक अगरवालला सलामीवीर म्हणून संधी मिळाली. मात्र, ज्यामध्ये तो अपयशी ठरला होता. या चार डावात १७,९,०, ५ अशा धावा करू शकला. खेळाडूंच्या दुखापतीमुळे मयांक ऑस्ट्रेलिया दौर्याच्या अंतिम कसोटीतही खेळला होता. परंतु, त्याला पाचव्या क्रमांकावर संधी मिळाली. या कसोटीत त्याने ३८ आणि ९ धावांच्या खेळ्या केल्या.
कसोटीच्या शेवटच्या ८ डावांमध्ये त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या ३८ इतकी होती. मयंकने घरगुती मैदानांवर चांगली कामगिरी केली. त्याने ५ कसोटी सामन्यांच्या ६ डावांमध्ये सुमारे १०० च्या सरासरीने ५९७ धावा केल्या आहेत. यात ३ शतकांचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2021: मुंबई इंडियन्सचे ३ असे खेळाडू, ज्यांना पूर्ण हंगाम बसून राहावं लागेल बाकावर
‘या’ भारतीय खेळाडूंनी घ्यायला पाहिजे कसोटीतून निवृत्ती, पुनरागमनाच्या अपेक्षा धूसर
एकाच दिवशी पदार्पण केलेल्या जोड्या, एकाने केले पुढे मोठे नाव तर दुसरा राहिला खूपच मागे