---Advertisement---

३ फेब्रुवारी हा दिवस शुबमन गिलसाठी या कारणांमुळे नेहमीच राहील लक्षात

On: रविवार, फेब्रुवारी 3, 2019 4:25 PM
---Advertisement---

वेलिंगटन। भारतीय संघाने आज(3 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध पाचवा वनडे सामना 35 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे. भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये वनडे मालिकेत 4 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

भारताच्या या वनडे संघात युवा प्रतिभाशाली फलंदाज शुबमन गिलचाही समावेश होता. त्यामुळे त्याने पहिल्यांदाच वरिष्ठ भारतीय संघाकडून वनडे मालिकेत विजय मिळवला आहे.  विशेष म्हणजे त्याच्यासाठी 3 फेब्रुवारी हा दिवस अजून एका कारणाने खास ठरला आहे.

मागील वर्षी 3 फेब्रुवारीलाच 19 वर्षांखालील भारतीय संघाने चौथ्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यावेळीही गिल 19 वर्षांखालील भारतीय संघाचा सदस्य होता. हा विश्वचषकही न्यूझीलंडमध्येच झाला होता.

या 19 वर्षांखालील विश्वचषकात गिलने 6 सामन्यात 124 च्या सरासरीने 1 शतक आणि 2 अर्धशतकासह 372 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.

तसेच गिलने त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटबरोबरच भारत अ संघाकडून केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या वरिष्ठ वनडे संघात केएल राहुल ऐवजी संधी देण्यात आली.

त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या वनडेत अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली. मात्र गिलला फलंदाजीत खास काही करता आले नाही. तो चौथ्या वनडेत 9 धावांवर आणि पाचव्या वनडेत 7 धावांवर बाद झाला.

गिलची 6 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची टी20 मालिकेत कशी कामगिरी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोहली-रोहितच्या टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच केला असा पराक्रम

न्यूझीलंड विरुद्ध एमएस धोनीच्या बाबतीत ९ वर्षांनंतर घडली ती नकोशी गोष्ट

३६ वर्षानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाच्या बाबतीत घडली ही गोष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment