भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्याच्या दोन दिवस आधी, भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी चांगल्या बातमीपेक्षा कमी नाहीत. पर्थमधील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन (WACA) येथे खेळल्या गेलेल्या इंट्रा-स्क्वॉड सामन्यादरम्यान स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना शुबमन गिलला दुखापत झाली होती. त्यानंतर बातम्या येत होत्या की त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे आणि तो पर्थमध्ये खेळू शकणार नाही. दरम्यान आता मॉर्नी मॉर्केलने पर्थ कसोटीच्या दोन दिवस आधी पत्रकार परिषदेत गिलच्या दुखापतीबाबत ताजी माहिती दिली.
गिलच्या दुखापतीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मॉर्केल म्हणाला, ‘त्याच्या दुखापतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. तो खेळेल की नाही याचा निर्णय आम्ही पर्थ कसोटी सामन्याच्या दिवशी सकाळी घेऊ, त्याने मॅच सिम्युलेशनमध्ये चांगली फलंदाजी केली, त्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून पर्थ कसोटी खेळता यावे. अशी अपेक्षा आम्ही सर्वजण करत आहोत.
शमीबाबत मॉर्केल म्हणाला, ‘आम्ही शमीवर बारीक लक्ष ठेवून आहोत, तो एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर आहे, त्याने पुन्हा खेळायला सुरुवात केली आहे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. तो एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे.’ जसप्रीत बुमराहसाठी, मॉर्केल म्हणाला की तो एक नैसर्गिक बाॅलर आहे. याशिवाय मॉर्नी मॉर्केल विराट कोहलीबद्दल म्हणाला की, त्याला पाहून युवा खेळाडूंना खूप काही शिकण्याची संधी मिळेल.
याशिवाय, मॉर्केलने नितीश रेड्डीचेही कौतुक केले, ‘तो एक युवा खेळाडू आहे जो अष्टपैलू फलंदाज आहे. तो आमच्यासाठी एक असा खेळाडू असेल जो विशेषतः पहिल्या दोन दिवसांत एक बाजू हाताळू शकेल. प्रत्येक संघाला वेगवान अष्टपैलू खेळाडूची गरज असते. त्याचा कसा वापर करतो हे जसप्रीत बुमराहवर अवलंबून असेल.
हेही वाचा-
पर्थ कसोटीत जडेजा किंवा सुंदरला नाही, तर या फिरकीपटूला मिळणार संधी, पाहा नेमकं कारण
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर, अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज ठरणार
IPL 2025; “मोहम्मद शमीवर मोठी बोली लागणार नाही…’, माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य