---Advertisement---

विजय पथावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का! शुबमन गिल ‘या’ कारणामुळे दुसऱ्या डावाबाहेर

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 11:56 AM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध चेन्नईत चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात चमकदार कामगिरी करत सामन्यावर आपली पकड बनवून ठेवली आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशीही (१६ फेब्रुवारी) भारतीय खेळाडू आपली लय कायम राखत अप्रतिम कामगिरी करत आहेत. अशात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा युवा खेळाडू शुबमन गिल इंग्लंडच्या दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गिलला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करतेवेळी त्याचा डावा हात जखमी झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संघ प्रशिक्षकांनी त्याच्या हाताचे स्कॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच कारणामुळे चौथ्या दिवशी त्याला क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर पाठवण्यात आले नाही.

२१ वर्षीय शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. डिसेंबर २०२० मध्ये मेलबर्न झालेल्या ऐतिहासिक सामन्यातून त्याने कसोटी पदार्पण केले होते. या कसोटी मालिकेतील अखेरच्या तिन्ही सामन्यात दमदार कामगिरी करत त्याने संघातील आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला संधी मिळाली. आतापर्यंत गिलने ५ कसोटी सामने खेळले असून तब्बल ३५२ धावा काढल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दस का दम! कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा अश्विनने दाखवला स्टोक्सला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडीओ

असा रचला होता पंत-अश्विनने लॉरेन्सच्या विकेटचा सापळा, चाहत्याने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

गुलीगत धोका! अश्विनचा चेंडू लॉरेन्सच्या पायातून पंतकडे, क्षणाचाही विलंब न करता पाठवला तंबूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---