वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील तिसरा व शेवटचा वनडे सामना बुधवारी (२७ जुलै) पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामीवीरांनी प्रशंसनीय कामगिरी केली. सलामीवीर शुबमन गिल याने कर्णधार शिखर धवनला साथीला घेत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. यादरम्यान गिलने स्वत:चे वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले. आपल्या या शानदार खेळीदरम्यान त्याने मारलेला एक षटकार आकर्षक ठरला आहे.
शुबमन गिलचा खणखणीत षटकार
वेस्ट इंडिजचा फिरकीपटू हेडन वॉल्श याच्या गोलंदाजीवर गिलने (Shubman Gill) हा षटकार (Shubman Gill Six) ठोकला. भारतीय संघाच्या डावातील १५ वे षटक टाकण्यासाठी वॉल्श आला होता. त्याच्या या षटकातील दुसऱ्या चेंडूला गिलने लॉन्ग ऑनवरून टोलवत षटकारासाठी पाठवले. त्याने अतिशय सहज हा षटकार ठोकला. त्याच्या षटकाराचा चेंडू तब्बल १०४ मीटर (104m Six By Gill) दूर स्टेडियमच्या छप्परवर जाऊन पडला. त्यामुळे गोलंदाजीसाठी नवीन चेंडू आणावा लागला.
गिलच्या या जबरदस्त षटकाराचे क्रिकेटचाहत्यांकडून कौतुक होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल (Shubman Gill Six Video) केला आहे.
https://twitter.com/CricketMagnemo/status/1552302227062419457?s=20&t=-RaqmkAcOLSSVrPrEKGQHA
पावसामुळे थांबवावा लागला खेळ
दरम्यान या सामन्यात नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी निवडली. कर्णधार धवन आणि सलामीवीर गिलने मिळून संघाला चांगली सुरुवातही करून दिली. धवन ७४ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५८ धावा करून बाद झाला. तर गिलने ६५ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा फटकावल्या आहेत. मात्र पावसामुळे मध्येच खेळ थांबवावा लागला आहे. पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी भारतीय संघ २४ षटकात एका विकेटच्या नुकसानावर ११५ धावा अशा स्थितीत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे मालिका तर जिंकली, टी२० जिंकणे अवघड? वेस्ट इंडिजचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज परततोय
धवन-गिल जोमात, वेस्ट इंडिज कोमात! तिन्ही वनडेत कॅरेबियन्सना फुल नडले
WTC: श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारताच टीम इंडियाला होणार मोठा फायदा, वाचा काय आहे समीकरण