---Advertisement---

भारत-पाकिस्तान सामन्यातून शुबमन करणार पुनरागमन? प्रशिक्षकांनी दिली अपडेट

On: बुधवार, ऑक्टोबर 11, 2023 3:50 PM
shubman gill century
---Advertisement---

विश्वचषक 2023 मधील भारताचा दुसरा सामना आज अफगानिस्तान बरोबर दिल्ली येथे होत आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल खेळत नाही . कारण तो य़ावेळी डेंगूशी झुंज देत आहे. तर भारत विश्वचषकातील आपला तिसरा सामना पाकिस्तानशी 14 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे खेळणार आहे. या सामन्याअगोदर गिलबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

गिल सध्या मेडीकल टिमच्या निरीक्षणाखाली आहे. त्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही मीडिया रिपोट्सनुसार गिल लवकरच अहमदाबाद येथे भारतीय संघाशी जोडला जाईल. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध खेळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतू गिलच्या फिटनेसबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी भारत-अफगानिस्तान सामन्याअगोदर प्रेस कॉन्फ्रंस घेतली. त्यावेळी त्यांना गिलबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “तो आजारातून बाहेर येत आहे. त्याला आता हॉटेलमध्ये आणले गेले आहे. तो सध्या मेडीकल टिमच्या निरीक्षणाखाली आहे. आम्ही आशा करतो की तो लवकर बरा होईल आणि संघाबरोबर जोडला जाईल.”

शुभमन गिलने भारतासाठी आतापर्यंत 35 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 66.10 च्या सरासरीने 1917 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 6 शतक व 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने वनडेमध्ये 1 द्विशतकही झळकावले आहे.

(Shubman Gill Might Fit For Match Against Pakistan)

हेही वाचा-
रिझवानचा भीमपराक्रम! श्रीलंकेविरुद्धच्या तडाखेबंद शतकामुळे केला ‘हा’ विक्रम, 18 वर्षे जुना Record उद्ध्वस्त
दिल्लीत टीम इंडियापुढे अफगाणी आव्हान, पाहुण्यांनी जिंकला टॉस; रोहितसेनेतून स्टार खेळाडू बाहेर- Playing XI

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---