भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy 2023) आधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player Of The Month) पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे (Devon Conway) याला देखील या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
🇮🇳 🇳🇿 🇮🇳
Three incredible performers have made the shortlist for ICC Men's Player of the Month for January 2023 👌
— ICC (@ICC) February 7, 2023
आयसीसीने मागील वर्षीपासून दर महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता या नवीन वर्षी पहिल्या महिन्यात या पुरस्कारासाठी सिराज, गिल व कॉनवे यांच्या स्पर्धा रंगेल.
जानेवारी महिन्यात या तिन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून दाखवली. शुबमन गिल याने या महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वनडे व टी20 तसेच न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत सहभाग घेतला. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत तो केवळ एकच 46 धावांची खेळी करू शकलेला. मात्र त्यानंतरच्या तीन वनडेत अनुक्रमे 70, 21 व 116 धावा केल्या. तर, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत त्याने आपला हा फॉर्म कायम राखत 112, 40 व विक्रमी 208 धावांची खेळी केलेली.
त्याचवेळी मोहम्मद सिराज याने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत तीन सामने खेळताना 9 व न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यात 5 बळी आपल्या नावे केलेले. याच दरम्यान त्याने वनडे गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान देखील मिळवले आहे. तर, न्यूझीलंडच्या कॉनवे याने पाकिस्तान व भारत दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या वर्षातील पहिल्याच महिन्यात तीन शतके व दोन अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे आता हा पुरस्कार कोण आपल्या नावे करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
(Shubman Gill Mohammad Siraj And Devon Conway Nominated For ICC Player Of The Month)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबानं थट्टा आज मांडली! अनबॉक्सिंग करण्यापूर्वीच गमावला विराटचा नवा कोरा फोन, चाहत्यांकडे मागितली मदत
राहुलने पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनची माहिती केली लीक! ताबडतोब घ्या जाणून