आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (5 एप्रिल) फलंदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली. या नव्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा ऐडन मार्करम याने मोठी मजल मारली आहे. त्याचवेळी भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसून, युवा फलंदाज शुबमन गिल हा भारतात सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड या वनडे मालिकेनंतर आयसीसीने नवी फलंदाजी क्रमवारी जाहीर केली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या ऐडन मार्करम याने 175 धावांची खेळी केली होती. या खेळीचा त्याला फायदा झाला. 13 स्थानांच्या फायद्यासह तो 41 व्या क्रमांकावर पोहोचला. तसेच तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत 31 व्या क्रमांकावर आला. ही मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आगामी वनडे विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवली आहे.
New Zealand and Sri Lanka make merry in the recent @MRFWorldwide ICC Men’s Player Rankings ✨
More 👇https://t.co/vGc9VLxqqw
— ICC (@ICC) April 5, 2023
फलंदाजांच्या क्रमवारी बद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा रासी वॅन डर डसेन व तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचाच इमाम उल हक विराजमान झालाय. भारतीय खेळाडूंमध्ये युवा सलामीवीर शुबमन गिल हा सर्वोच्च क्रमांकावर आहे. गिलने आपला चौथा क्रमांक कायम राखला असून, विराट कोहली सहाव्या तर कर्णधार रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहेत.
गोलंदाजांच्या क्रमवारीबाबत सांगायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवूड पहिल्या क्रमांकावर तर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा मोहम्मद सिराज हा देखील टॉप तीनमध्ये असून, त्यानंतर थेट 25 व्या क्रमांकावर कुलदीप यादव दिसून येतो. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा एकही खेळाडू पहिल्या 10 मध्ये नाही.
(Shubman Gill moves to number 4 in ICC ODI batters ranking He is the highest ranked Indian batter currently in ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोलंदाजांना शिस्तीत आणण्यासाठी गावसकरांनी सुचविला ‘हा’ उपाय, म्हणाले, “वाईड चेंडू टाकणारे…”
मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध अहमदनगर पेरियार पँथर्सचा सामना बरोबरीत