भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सातत्याने चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो आणि त्याची कथित मैत्रीण अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या दरम्यान सोशल मीडियावर चांगलेच ‘पोस्ट वॉर’ लढले गेलेले. दोघेही एकमेकांचे नाव न घेत अस सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत होते. त्यामुळे चांगलाच वाद निर्माण झालेला. आता याच वादावर रिषभचा भारतीय संघातील सहकारी शुबमन गिल याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया चषक व विश्वचषकाच्या दरम्यान उर्वशी व रिषभ हे सातत्याने सोशल मीडिया पोस्ट करत एकमेकांना प्रत्युत्तर देत होते. उर्वशी ‘आरपी’ असे संक्षिप्त नाव घेऊन पोस्ट करत होती. हे संपूर्ण प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये चांगलेच गाजलेले. रिषभ व उर्वशी काही काळाआधी एकमेकांचे प्रियकर व प्रेयसी असल्याचे सांगितले जाते.
या संपूर्ण प्रकरणावर आता भारतीय क्रिकेटपटू व रिषभचा संघ सहकारी असलेला शुबमन गिल व्यक्त झाला आहे. गिलने नुकतेच एका पंजाबी अभिनेत्री ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना या विषयाची सत्यता सांगितली. रिषभ-उर्वशी यांच्या दरम्यान खरेच काही वाद आहेत की केवळ याबाबतच्या वापरल्या जातात असे विचारले असता तो म्हणाला,
“इतके मला माहित आहे त्यानुसार रिषभच्या बाजूने काहीही नाही. तो तिच्या कोणत्याही कृतीने प्रभावित होत नाही. खरंतर उर्वशीलाच वाटत होते की कोणीतरी तिला चिडवावे.”
चालू सामन्यात अनेकदा चाहते रिषभला चिडवताना दिसतात. यावर अनेकदा तो संतप्त झाल्याचे देखील पाहायला मिळाला आहे. दुसरीकडे, उर्वशी सध्या तिच्या कारकिर्दीवर लक्ष देणार असल्याचे सांगितले जाते.
(Shubman Gill On Rishabh Pant And Urvashi Rautela Controversy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसीची अपराजित मालिका खंडित; केरला बास्टर्सने दिला पराभवाचा धक्का
ठरलं एकदाचं! खुद्द वडिल सुनील शेट्टीने केले केएल राहुल-आथिया शेट्टीच्या लग्नाबाबत मोठे वक्तव्य