भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला मंगळवारी (10 जानेवारी) खेळला जात आहे. गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे सलामीला उतरले. मात्र, भारताच्या अखेरच्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावणारा ईशान किशन याला बाकावरच बसावे लागले.
या सामन्यासाठी सलामीवीर म्हणून भारतीय संघासमोर अनेक पर्याय उपलब्ध होते. स्वतः कर्णधार रोहित शर्मासह केएल राहुल, मागील दोन वनडे मालिकांमध्ये मालिकावीर ठरलेला युवा शुबमन गिल तसेच बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावणारा ईशान किशन हे सर्वजण संघाचा भाग आहेत. मात्र, यातून रोहितने आपल्यासह गिल याला संधी दिली. त्यामुळे ईशान किशन याला बाकावर बसावे लागले.
भारतीय संघाने या सामन्याआधी आपला अखेरचा वनडे सामना बांगलादेशमध्ये खेळलेला. त्यावेळी रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने ईशान किशन याला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आलेली. त्याने या संधीचे अक्षरशः सोने करताना 131 चेंडूवर 24 चौकार व 10 षटकारांचा पाऊस पाडत 210 धावांची खेळी केली होती. अशा स्थितीतही त्याला बाकावर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गिलने वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वेविरूद्धच्या वनडे मालिकांमध्ये शानदार कामगिरी करत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाने व कर्णधाराने त्याला संधी दिल्याचे सांगितले जात आहे.
पहिल्या वनडेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
(Shubman Gill Open For India Against Srilanka Ahead Double Centurion Ishan Kishan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉचे झंझावाती शतक, वादळी खेळी करत बीसीसीआयच्या निवड समितीला फटकारले!
विराटची नजर सचिनच्या ‘त्या’ वर्ल्ड रेकॉर्डवर, श्रीलंकेविरुद्ध करणार का कमाल?