भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात आगामी 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी अलिकडेच शुबमन गिलने (Shubman Gill) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) शानदार शतक झळकावले होते. तथापि, असे असूनही, पंजाबला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तथापि, पुन्हा एकदा शुबमन गिल नेट्समध्ये परतला आहे. गिलचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शुबमन गिल (Shubman Gill) त्याच्या वडिलांसोबत नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. वास्तविक, भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. शुभमन गिल या मालिकेचा एक भाग आहे.
गिलचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याशिवाय, सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वी, रणजी ट्रॉफीमध्ये गिलने कर्नाटकविरूद्ध शानदार शतक झळकावले होते. दरम्यान त्याने 171 चेंडूत 102 धावा केल्या. पण या शतकानंतरही पंजाबला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. कर्नाटकने पंजाबचा 1 डाव आणि 207 धावांनी धुव्वा उडवला.
भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका (6 फेब्रुवारी) पासून सुरू होईल. दोन्ही संघांतील पहिला वनडे सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. यानंतर दुसरा सामना (9 फेब्रुवारी) रोजी कटकमध्ये खेळला जाईल. तर, या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना (12 फेब्रुवारी) रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG; चक्रवर्तीने घेतली इंग्लंडची फिरकी, विजयासाठी भारताला 172 धावांची गरज
बुमराहने रचला इतिहास..! अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज
भारताचा पुढचा विराट-रोहित कोण? माजी क्रिकेटपटूंची मोठी प्रतिक्रिया





