भारतीय क्रिकेट संघ सध्या विजयरथावर स्वार असून त्यांनी नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितही वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत क्लिन स्वीप केले आहे. प्रभारी कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० ने पराभूत केले आहे. या मालिका विजयात शुबमन गिल याचा मोलाचा वाटा राहिला. त्याने पहिल्या सामन्यातून ते तिसऱ्या सामन्यापर्यंत आपले चमकदार प्रदर्शन सुरू ठेवले.
तिसऱ्या सामन्यात (Third ODI) तर त्याने नाबाद ९८ धावांची प्रशंसनीय खेळी केली. परंतु पावसाच्या कारणामुळे त्याचे वनडे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक (Shubman Gill Century) हुकले. मात्र गिलला ही मोठी संधी हुकल्याचे जास्त दुख नाही. खुद्द गिलनेच अशी प्रतिक्रिया दिली आहे.
बुधवारी (२७ जुलै) पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ११९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात गिल ९८ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ९८ धावांवर नाबाद राहिला. पावसामुळे भारतीय संघाचा डाव ३६ धावांवरच थांबवावा लागल्याने अवघ्या २ धावांनी त्याचे शतक हुकले.
3⃣ Matches
2⃣0⃣5⃣ Runs@ShubmanGill put on a fantastic show with the bat in the three ODIs to bag the Player of the Series award. 👏👏#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/srUrbhqOVn— BCCI (@BCCI) July 27, 2022
या सामन्यानंतर आपल्या अधुऱ्या शतकाबद्दल बोलताना गिल (Shubman Gill On His Centry) म्हणाला की, “पहिल्या २ सामन्यात मी ज्या पद्धतीने बाद झालो होतो, त्यामुळे मी निराश होतो. याचमुळे मी अंतिम सामन्यात स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात होतो. पावसाच्या शेवटच्या व्यत्ययापूर्वी मला फक्त एक षटक हवे होते. मला माझे शतक पूर्ण होण्याची पूर्ण अपेक्षा होती. परंतु पाऊस आला आणि माझे शतक अधुरे राहिले. या गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. पण मी माझ्या या खेळीने खूप आनंदी आहे.”
भलेही गिल त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकापासून हुकला असला तरीही, तो चांगल्या सुरुवातीनंतर आपल्या खेळीला मोठ्या खेळीत रुपांतरित करू शकल्याने खूप समाधानी आहे. ही गिलच्या ३ वर्षांच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट खेळी राहिली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा अशोक डिंडाने चक्क सचिन तेंडुलकरला स्लेज करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे झाले ते…
डिव्हिलियर्सला विसरायला लावणारा स्टब्स आहे तरी कोण? २८ बॉलवर उडवला ७२ धावांचा धुरळा
त्रिनिदादमध्ये भारताचे जास्त सामने घेतल्याने संतापला कॅरेबियन दिग्गज; म्हणाला, “काय गरज होती ?”