येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२(Indian premier league 2022) स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडणार आहे. ज्यामध्ये अनेक युवा खेळाडू आणि दिग्गज खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे युवा भारतीय फलंदाज शुबमन गिल. कोलकाता नाईट रायडर्स संघाने (kolkata knight riders) शुबमन गिलला (shubman gill) पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी रिलीज केले आहे. आता लिलाव सुरू होण्यापूर्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने पुढील हंगामासाठी आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरीनला रिटेन केले आहे. शुबमन गिल सध्या एनसीएमध्ये आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत तो दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या संघात निवड करण्यात आली नाहीये. त्याला २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात स्थान दिले होते.
एकवेळी शुबमन गिलला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात होते. परंतु, त्याला दिनेश कार्तिक, ओएन मॉर्गन, राहुल त्रिपाठीसह कोलकाता नाईट रायडर्स संघातून रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान शुबमन गिलने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “माझे कोलकाता नाईट रायडर्स सोबत जे नाते आहे, ते खूप खास आहे. एकदा तुम्ही कोणत्याही एका फ्रँचायझीशी जोडले गेले की, तुम्हाला त्याच फ्रँचायझीशीच जोडून रहायचे असते आणि नेहमी त्यासाठी खेळायचे असते. मला केकेआरकडून खेळण्याचा पर्याय मिळाला तर मला नेहमीच त्यांच्यासाठी खेळायला आवडेल.”(shubman gill statement)
आयपीएल २०१८ मध्ये शुबमन गिलला १.८ कोटींची बोली लावत खरेदी करण्यात आले होते. त्याने आपल्या पहिल्याच हंगामातील १३ सामन्यात २०३ धावा केल्या होत्या. तसेच त्याची आयपीएल स्पर्धेतील एकूण कामगिरी पाहिली तर त्याने, ५८ सामन्यात १२३ च्या स्ट्राइक रेटने १४१७ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी
Video: शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज, फलंदाजीसाठी समोर ट्रेंट बोल्ट; मग काय ‘असा’ ठोकला षटकार
हे नक्की पाहा: