भारतीय क्रिकेट संघातील उभरता सितारा शुभमन गिल आणि महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या अफेयरची बर्याचदा सोशल मीडियावर चर्चा होत असते. गिलने गाबा कसोटीत 91 धावा केल्या होत्या. तेव्हाही सारा तेंडुलकर आणि गिलच्या अफेअरविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. जरी या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाही, परंतु सोशल मीडिया वापरकर्ते त्यांना प्रेयसी-प्रियकर संबोधतात.
खरे सांगायचे तर, यामागील कारण म्हणजे या दोघांचे सोशल मीडियावर सक्रिय राहणे. ते म्हणतात ना, ‘आग लागल्याशिवाय धूर होत नाही’ अगदी तसेच काहीतरी घडलं असावं. त्यानंतरच गिल-साराच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. या लेखात आम्ही अशाच काही कारणांचा आढावा घेतला आहे, ज्यामुळे गिल आणि सारा यांच्यातील अफेअरच्या चर्चांना तोंड फुटले असावे.
१. दोघांच्या कुटुंबातील सदस्यही एकमेकांना फॉलो करतात
युवा सलामीवीर शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या अफेअरची बातमी तुम्ही बर्याचदा ऐकली असेल. आता तुम्हाला माहिती आहे की, सारा तेंडुलकर केवळ शुभमन गिललाच फॉलो करत नाही. ती त्याच्या दोन्ही बहिणींना देखील फॉलो करते. एखाद्यावेळी गिलने साराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना फॉलो करणे साहजिक आहे. कारण सारा ही मास्टर ब्लास्टर सचिनची मुलगी आहे.
मात्र आश्चर्य वाटण्यासारखी बाब अशी की, सारा गिलच्या कुटुंबातील सदस्यांना फॉलो करते. सारा ही गिलच्या बहिणी सेहनील गिल आणि सिमरत गिल यांना फॉलो करते. अशाप्रकारे गिलच्या कुटूंबीयांना साराने दर्शविलेली आवड कुठेतरी या दोघांच्या नात्याकडे लक्ष वेधते.
२. जेव्हा शुभमन गिल-सारा तेंडुलकरने एकसारखे कॅप्शन ठेवले होते
सोशल मीडियाचा एक ट्रेंड आहे, ज्यामध्ये बरीच जोडपी एकसारखे स्टेटस किंवा पोस्टमध्ये एकच कॅप्शन ठेवतात. काही काळापूर्वी शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरनेही असेच काहीसे केले होते. आतापर्यंत त्यांचे कथित संबंध गुप्त ठेवणार्या या जोडप्याने जुलैमध्ये आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांचे फोटो शेअर केले होते. या फोटोंना दोघांनीही एकसारखेच कॅप्शन टाकले होते.
https://www.instagram.com/p/CDOm4kYgBhk/?utm_medium=copy_link
https://twitter.com/RealShubmanGill/status/1288472091809837057?s=19
होय, वरील दोन पोस्टमध्ये आपण पाहु शकता की, शुभमन गिलने चष्मामध्ये एक स्मार्ट दिसणारा फोटो शेअर केला होता आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की – I SPY आणि दोन डोळ्यांची इमोजी शेअर केली होती. यानंतर सारा तेंडुलकरनेही स्वत:चा एक फोटो शेअर केला होता आणि I SPY कॅप्शनमध्ये लिहिले होते. यापुढे सारानेही दोन डोळ्यांचा इमोजी शेअर केले होते.
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या या सोप्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी बरेच प्रश्न विचारले होते. पण नेहमीप्रमाणे दोघांनीही शांततेचा अवलंब केला आणि फोटोवर येणाऱ्या हजारो टिप्पण्यांकडे दुर्लक्ष केले होते.
३. साराने शुभमनसाठी हार्ट इमोजी पोस्ट केले होते
इंडियन प्रीमियर लीग २०२० मध्ये असे काहीतरी घडले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याला उधाण आले होते. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला जात होता. त्यावेळी या सामन्याची एक क्लिप सारा तेंडुलकरने रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर अपलोड केली.
या क्लिपमध्ये शुभमन गिल मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या शॉटला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसला. साराने गिलचा हा व्हिडिओ फक्त स्टोरीवर शेअर केला नव्हता; तर त्याचवेळी तिने स्टोरीमध्ये ह्रदयाचा इमोजीदेखील जोडला होता. हे पाहून साराची पोस्ट व्हायरल झाली आणि चाहत्यांनी हार्ट इमोजीद्वारे तिच्या भावनांचा अंदाज लावला होता. ही तीन कारणे आहेत, ज्यामुळे या दोघांच्या अफेअरविषयी नेहमीच चर्चेत रंगते.
महत्त्वाच्या बातम्या-
वडिल गेल्यावर गुरुजींनी वाढवला सिराजचा आत्मविश्वास; म्हणाले, ‘बापाचे आशिर्वाद सोबत आहेत, तू…’
‘या’ फलंदाजाच नादच खुळा, कसोटीत १० हजार धावा करणाऱ्या गावसकरांना करायचीय त्याच्यासारखी फलंदाजी
ऐकलंच पाहिजे! ‘किंग’ कोहली अन् ‘कोच’ शास्त्रींमधील संवादाचा ‘तो’ ऑडिओ लीक; इंटरनेटवर जोरदार व्हायरल






