भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिलने अत्यंत कमी वयात जगभरातील क्रिकेट पंडितांना आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने प्रभावित केले आहे. गिलने ऑस्ट्रेलिया दौर्यावरील दुसऱ्या कसोटी सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले व संपूर्ण मालिकेत त्याने शानदार कामगिरी केली. यानंतर मात्र गिल इंग्लंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेतील फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. दरम्यान, त्याची आता 18 ते 22 जून दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे, याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
गिल म्हणाला की ,”आयपीएलदरम्यान नेटमध्ये पॅट कमिन्स आणि लॉकी फर्ग्युसनसारख्या गोलंदाजांन विरुद्ध खेळणे हे खूपच उपयुक्त ठरणार आहे. जगभरातील अशा उत्तम गोलंदाजांविरुद्ध खेळल्यामुळे जो आत्मविश्वास मिळतो, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बर्याच काळासाठी फायदेशीर ठरतो.”
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा व इतर बाबींबद्दल बोलताना गिल म्हणाला, “जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन इतर संघांविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला माहित असते की ते कशाप्रकारे गोलंदाजी करतात. या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. मागील काळात ऑस्ट्रेलियामध्ये आमची कामगिरी चांगली होती. गेल्या काही वर्षांपासून, आम्ही विदेशी दौऱ्यात शानदार कामगिरी केलेली आहे.”
गिल पुढे म्हणाला, “आमचा आत्मविश्वास सध्या परिपूर्ण आहे आणि मला असे वाटत नाही की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी यापेक्षा मी चांगली तयारी करू शकेल.”
दरम्यान अशी शक्यता वर्तवली जात आहे की जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये शुभमन गिल भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
ख्रिस गेलच्या अतरंगी फोटोवर डेव्हिड वॉर्नरने घेतली फिरकी; केली ‘अशी’ विनोदी कमेंट
विराट-अनुष्काची पुन्हा अभिमानास्पद कामगिरी, दुर्मिळ आजार असलेल्या अयांशला केली ‘ही’ मदत
PUMA ने शब्द पाळला! बर्लच्या ट्विटमुळे संपूर्ण झिम्बाब्वे संघासाठी पाठवले नवे बुटांचे जोड, पाहा फोटो