झिम्बाब्वे दौऱ्यावर असणारा भारतीय संघ (ZIMvsIND) उल्लेखनीय कामगिरी करत आहे. भारत या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. त्यातील तिसरा सामना सोमवारी (२२ ऑगस्ट) खेळला जात आहे. भारताने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाहुणा संघ मालिकेत २-० असा विजयी आघाडीवर आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा फलंदाज शुबमन गिलने त्याचे क्रिकेट कारकिर्द आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले शतक केले आहे. त्याचबरोबर त्याने काही विक्रमही केले आहेत.
या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरवत भारताच्या वरच्या फळीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. भारताचे सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. संघाला चांगली सुरूवात करून दिल्यावर ते दोघे बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शुबमन गिल (Shubman Gill) याने जबरदस्त खेळी केली आहे. तो या दौऱ्यावर भलताच फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने या सामन्यात ८२ चेंडूत वनडेतील आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक केले. याबरोबरच तो झिम्बाब्वे विरुद्ध वनडेतील पहिले-वहिले शतक करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
Maiden ODI century for Shubman Gill ✨
Watch the final #ZIMvIND ODI FREE on https://t.co/yYQHgoDHWB (in select regions) 📺
Scorecard: https://t.co/NGDK5ZbSft pic.twitter.com/VcAQpdPq5R
— ICC (@ICC) August 22, 2022
गिलच्या आधी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल यांनीही त्यांच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झिम्बाब्वे विरुद्ध केले आहे. रोहितने २०१०मध्ये तिरंगी मालिकेत झिम्बाब्वे विरुद्ध ११९ चेंडूत ११४ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ४ षटकार फटकारले.
राहुलने २०१६मध्ये वनडे पदार्पणच झिम्बाब्वे विरुद्ध केले होते. त्यावेळी त्याने हरारे येथे झालेल्या सामन्यात नाबाद १०० धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने सलामीला येत ७ चौकार आणि १ षटकार मारत ही शतकी खेळी केली होती. आता गिलनेही त्याची पुनरावृत्ती करत शतक ठोकले आहे. त्याने या सामन्यात ९७ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १३० धावा केल्या आहेत.
योगायोग म्हणजे या तिघांनीही त्यांच पहिले वनडे शतक झिम्बाब्वे विरुद्ध झिम्बाब्वेमध्येच केले आहे.
भारतीय खेळाडूंचे पहिलं वनडे शतक आणि झिम्बाब्वे कनेक्शन
वर्ष खेळाडू
२०१० – रोहित शर्मा (११४)
२०१६ – केएल राहुल (१००*)
२०२२ – शुबमन गिल (१३०)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकादरम्यान ‘हे’ भारतीय दिग्गज करतील हिंदी भाषिकांचे मनोरंजन, पाहा संपूर्ण यादी
WBC 2022: अश्विनी-सिक्की आणि तनिषा-ईशानची विजयी सुरुवात, प्रणितच्या नशीबी निराशा
रोहित शर्माचा मार्ग मोकळा, कर्दनकाळ ठरलेला ‘हा’ श्रीलंकन गोलंदाज आशिया चषकातून बाहेर!