क्रिकेटच्या मैदानात पंचांचा निर्णय अंतिम असतो. परंतु त्यांनी दिलेला निर्णय प्रत्येक वेळी बरोबरच असेलच, असे नाही. अनेकदा पंचांच्या निर्णयाशी खेळाडू सहमत दिसत नसतात. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल योच्यासोबत देखील असाच काही प्रकार घडल्याचे दिसले. शुबमनने या प्रसंगाचा व्हिडिओ स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे आणि चाहत्यांना त्यांचे मत विचारले आहे.
दरम्यान शुबमन गिल (Shubman Gill) सध्या काउंटी चॅम्पियनशिप खेळत आहे. काउंटी चॅम्पियनशिपच्या एका सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्याचे पाहायला मिळाले. पंचांनी गिलला एलबीडब्ल्यू बाद करार दिला होता. त्याने या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पंचांचा निर्णय योग्य वाटतो की नाही? यावर त्याने चाहत्यांना मत विचारले आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “आउट की नॉटआउट? तुम्हाला काय वाटते?”
त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला देखील सुरुवात केली आहे. काही चाहत्यांच्या मते पंचांचा निर्णय योग्य होता. चेंडू मधल्या स्टंपवर लागला असता आणि गिल बाद होता, असे या चाहत्यांना वाटत आहे. तर दुसरीकडे अनेकांच्या मते गिल बाद नव्हता. चाहत्यांना वाटत आहे की, चेंडू लेग स्टंपला मिस करत होता, त्यामुळे गिल नक्कीच नाबाद असावा. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की, चेंडू जास्त बाउंस झाल्यामुळे स्टंपच्या वरून गेला असता आणि गिलने विकेट देखील गमावली नसती. या पोस्टवर चाहत्यांच्या एकापेक्षा एक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
https://www.instagram.com/reel/Ci4yneFK9L5/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, शुबमन गिल काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत ग्लेमॉर्गन संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. गिलच्या संघासोबत खेळताना वॉर्सेस्टशायर संघाने (Glamorgan vs Worcestershire) प्रथम फलंदाजी केली आणि 9 विकेट्सच्या नुकसानावर 454 धावा उभ्या केल्या. वॉर्सेस्टशायर संघाने त्याचा डाव घोषित केल्यानंतर ग्लोमॉर्गन संघासाठी शुबमन अप्रतिम खेळी केली, पण तरीही संघ पहिल्या डावात 295 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर ग्लोमॉर्गन संघाला फॉलोऑन दिला गेला. दुसऱ्या डावात संघाने फक्त पाच धावा केल्या होत्या आणि वेळ संपल्यामुळे सामना अनिर्णीत राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोठ्या बातमीच्या आशेने चाहत्यांनी टवकारले कान! एमएस धोनीने केले ‘हे’ जाहीर
कुलदीपच्या जाळ्यात अडकला न्यूझीलंड संघ, फिरकी गोलंदाजासमोर फलंदाजांचे लोटांगण