टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मानं टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता त्याच्या जागी भारतीय संघाचा कर्णधार कोण बनेल, या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं भविष्यात कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या जागी कोणता खेळाडू सर्वोत्तम ठरू शकतो, त्याचं नाव सांगितलं. मात्र सेहवागनं टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याचं नाव घेतलं नाही, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वीरेंद्र सेहवागनं आगामी काळात रोहित शर्मा नंतर युवा शुबमन गिल भारतीय संघाचा कर्णधार असावा, असं म्हटलं आहे. तसेच त्यानं झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी गिलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचं समर्थन केलंय. एकप्रकारे सेहवागनं हार्दिक पांड्या पुढचा कर्णधार नको असंच म्हटलंय.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यासह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत युवा शुबमन गिल अननुभवी भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल.
वीरेंद्र सेहवाग ‘क्रिकबझ’वर बोलताना म्हणाला, “शुबमन गिल दीर्घकाळ संघात राहील. तो तिन्ही फॉरमॅट खेळणारा खेळाडू आहे. गेल्या वर्षी त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. 2024 च्या टी20 विश्वचषकाला मुकणं त्याच्यासाठी दुर्दैवी होतं. माझ्या मते त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवायला हवं. उद्या जेव्हा रोहित शर्मा संघ सोडेल तेव्हा कर्णधारपदासाठी शुबमन गिल हा योग्य पर्याय आहे.”
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 वर्ल्डकपच्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा; भारतीय खेळाडूंचा दबदबा तर अफगाण खेळाडूंनाही स्थान
संसदेतही रोहित शर्माच्या नावाचा जयघोष, अध्यक्षांसह संपूर्ण सभागृहानं केलं अभिनंदन
विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव! जय शाह यांनी केली मोठी घोषणा