भारत आणि न्यूझीलंड यायंच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी या सामन्यात देखील संघाला वेगवान सुरुवात देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या सामन्यात रोहित शर्मा पाठोपाठ शुबमन गिल यानेही शतक ठोकले. गिलचे हे मागील चार सामन्यातील तिसरे शतक ठरले. मागील वर्षीपासून गिलने आपल्या खेळाने वनडे क्रिकेटवर अक्षरशः राज केले आहे.
गिलने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील अखेरच्य सामन्यात शतक साजरे केले होते. त्यानंतर या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने थेट द्विशतकाला गवसणी घातली. दुसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद 40 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील चौथे शतक झळकावताना केवळ 78 चेंडूवर 13 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी केली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 300 पेक्षा जास्त धावा बनवणारा तो पहिला भारतीय फलंदाज बदला.
गिलने 2019 मध्ये आपले वनडे पदार्पण केले होते. मात्र, पहिल्या तीन सामन्यात तो आपली छाप पाडू शकला नव्हता. त्यानंतर 2022 मध्ये पुनरागमन केल्यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो मालिकावीर ठरलेला. त्यानंतर आता श्रीलंका व न्यूझीलंड मालिका गाजवत त्याने वनडे संघातील प्रमुख सलामीवीर म्हणून आपली जागा पक्की केलेली दिसते.
शुबमन गिलचे 2022 पासूनचे वनडे आकडे:
64(53), 43(49), 98*(98), 82*(72), 33(34), 130(97), 3(7), 28(26), 49(57), 50(65), 45*(42), 13(22), 70(60), 21(12), 116(97), 208(149), 40*(53) & 112(78)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या वनडेसाठी मैदानात उतरताच रोहित-विराटचा खास विक्रम, अझरुद्दीन अन् गांगुलीलाही पछाडले
तिसऱ्या वनडेत नाणेफेकीचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने, भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल