भारतीय संघाचा युवा कर्णधार शुबमन गिल (Team india’s captain Shubman gill) फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत असला, तरी त्याला सध्या नशिबाची साथ मिळत नाही. त्यामुळे तो अनेकदा आपल्या मनाप्रमाणे निर्णयही घेऊ शकलेला नाही. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर शुबमन गिलच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. सलग सामन्यांमध्ये तो मोठी संधी गमावत आहे. यापूर्वी सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) आणि रोहित शर्माही (Rohit Sharma) अशाच एका अनवांचित विक्रमात सामील झाले आहेत.
शुबमन गिल सलग पाचव्या टेस्ट सामन्यात टॉस हरला आहे. याचबरोबर, भारताने सलग 15व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात टॉस गमावला आहे. हा एक अत्यंत लाजीरवाणा विक्रम मानला जातो. क्रिकेटच्या इतिहासात हे केवळ 14व्या वेळेस घडलं आहे की, एखाद्या संघाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्व टॉस गमावले. गेल्या 25 वर्षांत 2018 साली भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत असा प्रसंग केवळ एकदाच घडला होता.
मागे 13 वेळां केवळ एकदाच अशा स्थितीत असलेल्या इंग्लंड संघाने 1953 अॅशेसमध्ये मालिका जिंकली होती.
याच वेळी, बेन स्टोक्सच्या (Ben Stocks) अनुपस्थितीत इंग्लंड संघाचं नेतृत्व करत असलेला ओली पोप (Ollie Pope) याने याआधी 4 टेस्टमध्ये कर्णधार म्हणून भाग घेतला होता आणि त्या सर्व सामन्यांत तो टॉस हरला होता. मात्र, या सामन्यात त्याने पहिल्यांदाच टॉस जिंकला. ओव्हलच्या मैदानावर गेले सात कसोटी सामने पाहता, टॉस जिंकणाऱ्या प्रत्येक संघाने पहिल्यांदा गोलंदाजीच निवडली आहे. काउंटी क्रिकेटमध्येही, ओव्हलवर गेले 22 सामने असेच झाले आहेत, टॉस जिंकणारा संघ नेहमीच आधी गोलंदाजी करत आला आहे.






