---Advertisement---

ईशान किशन-शार्दुल ठाकूरशी होणार शुबमन गिलची टक्कर; या स्पर्धेसाठी 5 संघ ठरले, पाहा संपूर्ण स्क्वॉड

On: शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025 12:50 PM
---Advertisement---

भारतीय घरगुती (डोमेस्टिक) क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धा दुलीप ट्रॉफी 2025 साठी संघांची घोषणा झाली आहे. बीसीसीआय आयोजित ही स्पर्धा 28 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान बेंगळुरूमध्ये होणार असून यंदा जुना फॉरमॅट परत आणण्यात आला आहे. मागीलवेळी चार संघांमध्ये सामने घेण्यात आले होते, मात्र तो प्रयोग बीसीसीआयला पसंत पडला नाही. यंदा सहा झोनल संघ स्पर्धेत उतरणार आहेत – नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट, सेंट्रल आणि नॉर्थ ईस्ट झोन.

स्पर्धेचे स्वरूप: एकूण 5 सामने – 2 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल आणि अंतिम सामना
साउथ आणि वेस्ट झोनला थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश

कर्णधारांची घोषणा
नॉर्थ झोन – शुबमन गिल
साउथ झोन – तिलक वर्मा (उपकर्णधार: मोहम्मद अजहरुद्दीन)
वेस्ट झोन – शार्दुल ठाकुर
ईस्ट झोन – ईशान किशन
सेंट्रल झोन – ध्रुव जुरेल (उपकर्णधार: रजत पाटीदार – फिटनेस क्लीयरन्सनंतर)
नॉर्थ ईस्ट झोन – अद्याप जाहीर नाही

सर्व संघांचा संघ (स्क्वॉड)
वेस्ट झोन: शार्दुल ठाकुर (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आर्या देसाई, हार्विक देसाई (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुश कोटियन, धर्मेंद्र जडेजा, तुषार देशपांडे, अर्जन नागवासवाला.

साउथ झोन: तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अजहरुद्दीन (उपकर्णधार), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काले, सलमान निजार, नारायण जगदीसन, त्रिपुराना विजय, आर. साई किशोर, तनय त्यागराजन, वैशाख विजयकुमार वैश्य, निधिश एमडी, रिकी भुई, बेसिल एनपी, गुरजापनीत सिंह, स्नेहल कौथंकर.

नॉर्थ झोन: शुबमन गिल (कर्णधार), अंकित कुमार (उपकर्णधार), शुभम खजूरिया, आयुष बदोनी, यश ढुल, अंकित कलसी, निशांत सिंधू, साहिल लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंह चरक, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, अंशुल कंबोज, औकिब नबी, कन्हैया वधावन (विकेटकीपर).

सेंट्रल झोन: ध्रुव जुरेल (कर्णधार, विकेटकीपर), रजत पाटीदार (उपकर्णधार– फिटनेस क्लीयरन्सवर अवलंबून), आर्यन जुयाल, दानेश मालेवार, संचित देसाई, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, दीपक चाहर, सारांश जैन, आयुष पांडे, वाई शुभम शर्मा, यश राठोड, हर्ष दुबे, मानव सुथार, खलील अहमद.

ईस्ट झोन: ईशान किशन (कर्णधार, विकेटकीपर), अभिमन्यु ईश्वरन (उपकर्णधार), संदीप पटनायक, विराट सिंह, डेनिश दास, श्रीदाम पॉल, शरणदीप सिंह, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), रियान पराग, उत्कर्ष सिंह, मनीषी, सूरज जायसवाल, मुकेश कुमार, आकाश दीप, मोहम्मद शमी.

नॉर्थ ईस्ट झोन: अद्याप जाहीर नाही.

दुलीप ट्रॉफी 2025 वेळापत्रक

28-31 ऑगस्ट (क्वार्टर फायनल-1) – नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन
28-31 ऑगस्ट (क्वार्टर फायनल-2) – सेंट्रल झोन विरुद्ध नॉर्थ ईस्ट झोन
4-7 सप्टेंबर (सेमीफायनल-1) – साउथ झोन विरुद्ध ठरायचे आहे
4-7 सप्टेंबर (सेमीफायनल-2) – वेस्ट झोन विरुद्ध ठरायचे आहे
11-15 सप्टेंबर – अंतिम सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---