भारताचा प्रतिभावान क्रिकेटपटू शुभमन गिल उर्वरित इंग्लिश काऊंटी हंगामासाठी ग्लॅमॉर्गनचे प्रतिनिधित्व करेल. चेतेश्वर पुजारा व्यतिरिक्त इतर अनेक भारतीय क्रिकेटपटू सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहेत. गिलने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सामन्यात मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. तो आतापर्यंत भारतासाठी ११ कसोटी आणि नऊ एकदिवसीय सामने खेळला आहे.
शुभमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे
गिल गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने शेवटच्या सहा वनडे सामन्यांमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. तो भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. एका वृत्तवाहिनीच्या मते, गिल व्हिसा मंजुरीच्या अधीन राहून ग्लॅमॉर्गनसाठी उर्वरित काऊंटी हंगामात खेळेल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘यंदाचा आशिया चषकात भारत…’, शेन वॉटसनने केलीये भविष्यवाणी
माजी पाकिस्तानी कर्णधाराची मनापासून इच्छा, PAKविरुद्ध भारताच्या इलेव्हनमध्ये असावा ‘हा’ मॅच विनर