---Advertisement---

शुबमन गिलने स्वत: नाकारली टीम इंडियाची कॅप्टन्सी! मोठं कारण आलं समोर

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 1:40 PM
Shubman-Gill
---Advertisement---

पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंड अ विरुद्धच्या तीन चार दिवसीय मालिकेसाठी प्रियांक पांचाळची भारत अ संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही घोषणा केली. या मालिकेत भारत अ चे नेतृत्व शुभमन गिल करेल अशी चर्चा यापूर्वी होती. मात्र, अचनकपणे प्रियांकची भारताच्या कर्णधारपदी वर्णी लागली अन् शुबमनला संघात स्थान मिळाले नाही यामुळे क्रिकेटजगतात चर्चांना उधानं आलं. मात्र, आता या सर्व गोषमटींचा खुलासा झाला आहे.

शुभमन गिलने काऊंटी हंगामातील उर्वरित सामने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने त्याला संघात स्थान दिले नसल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे भारत अ संघाकडून या दौऱ्यात न खेळण्याचा निर्णय सर्वस्वी शुबमनचा असल्याचे बोलले जात आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्ध खेळायला उतरताच कोहली रचणार विश्वविक्रम! ठरणार ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय
भारत-पाकिस्तान महामुकाबल्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात! जाणून घ्या काय आहे किंमत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---