औरंगाबाद । एड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स् सनराईज् इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात अनन्या एसआर, अमिशी शुक्ला, सुहिता मारूरी खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आगेकूच केली.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस् कॉम्पलेक्स् येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात मध्यप्रदेशच्या बिगरमानांकीत अमिशी शुक्लाने तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या राधिका महाजनचा 6-1, 6-1असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. तामिळनाडूच्या अनन्या एसआर हिने सातव्या मानांकित पश्चिम बंगालच्या स्वेता समंतावर 6-2, 6-1असा सनसनाटी विजय मिळवला. कर्नाटकच्या सुहिता मारुरीने हरियाणाच्या पंधराव्या मानांकित अंजली राठीचे आव्हान 6-4, 6-4असे मोडीत काढले. अव्वल मानांकित वैष्णवी आडकर हिने दिल्लीच्या तेजस्वी दबसला 6-1, 6-1असे नमविले.
मुलांच्या गटात चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या अर्जुन गोहडने दिल्लीच्या वंश कर्मावर 6-0, 6-0असा एकतर्फी विजय मिळवला. बाराव्या मानांकित महाराष्ट्राच्या दक्ष अगरवालने कर्नाटकच्या त्रिशूल जगदीशचा 6-4, 6-2असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठेने कर्नाटकाच्या रोहित मोनिलचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(1)असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: मुले:
आयुश भट(कर्नाटक)(1)वि.वि.धनंजय अथरेया(तामिळनाडू)6-1, 6-2;
प्रगतेश शिवशंकर(तामिळनाडू)वि.वि.वंश नांदल(हरियाणा)6-3, 6-1;
जस्मित दुहान(हरियाणा)(9)वि.वि.अँडी थावसेन(आसाम) 6-3, 6-2;
युवान नांदल(हरियाणा)(8)वि.वि.राघव हर्ष(हरियाणा)6-0, 6-1;
अर्जुन गोहड(महा)(4)वि.वि.वंश कर्मा(दिल्ली)6-0, 6-0;
अग्रीया यादव(हरियाणा) वि.वि.वरून गोलसुपुडी(तेलंगणा)6-2, 6-1;
अरुनवा मजुमदार(पश्चिम बंगाल)(11)वि.वि.मोहित रेड्डी(तेलंगणा)6-4, 6-1;
दक्ष अगरवाल(महा)(12)वि.वि.त्रिशूल जगदीश(कर्नाटक) 6-4, 6-2;
सिद्धार्थ मराठे(महा)वि.वि.रोहित मोनिल(कर्नाटक)6-2, 7-6(1);
रोनिन लोटलीकर(कर्नाटक)(14)वि.वि.अर्णव पापरकर(महा)6-1, 6-1;
मुली:
वैष्णवी आडकर(महा)(1)वि.वि.तेजस्वी दबस(दिल्ली) 6-1, 6-1;
सुहिता मारुरी(कर्नाटक) वि.वि.अंजली राठी(हरियाणा)(15) 6-4, 6-4;
चाहना बुधभटी(तेलंगणा)(9) वि.वि.सोहा सिंग(कर्नाटक)6-4, 6-1;
अनन्या एसआर(तामिळनाडू) वि.वि.स्वेता समंता(पश्चिम बंगाल)(7) 6-2, 6-1;
अमिशी शुक्ला(मध्यप्रदेश)वि.वि.राधिका महाजन(महा)(3) 6-1, 6-1;
कुंदना भंडारू(तामिळनाडू)(14) वि.वि.वैष्णवी वाघ 6-1, 6-0.