---Advertisement---

शेफाली- श्वेताची झुंज यशस्वी, दक्षिण आफ्रिकेला लोळवत 19 वर्षांखालील विश्वचषकात विजयी सुरुवात

On: शनिवार, जानेवारी 14, 2023 10:34 PM
IND-vs-SA
---Advertisement---

शनिवारपासून (दि. 14 जानेवारी) 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशीचा तिसरा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पार पडला. या स्पर्धेत शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला. या विजयात शेफाली आणि सलामीवीर श्वेता सेहरावत यांनी सिंहाचा वाटा उचलला. श्वेताला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला (South Africa Women) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. त्यांनी फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 166 धावा केल्या. भारतीय महिला (Indian Women) संघाने 3 विकेट्स गमावत 16.3 षटकात 170 धावा करत आव्हान गाठले. तसेच, विश्वचषकाची सुरुवात दिमाखात केली.

शेफाली- श्वेताच्या फलंदाजीचा जलवा
कर्णधार शेफाली वर्मा (Shafali Verma) हिने वादळी अंदाजात फलंदाजी केली. तिने अवघ्या 16 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या धावा करताना तिने 1 षटकार आणि 9 चौकारांची बरसात केली. शेफालीला अर्धशतक करण्यासाठी 5 धावा कमी पडल्या. मात्र, शेफाली बाद झाल्यानंतर सलामीवीर श्वेता सेहरावत (Shweta Sehrawat) हिने डाव सांभाळला. तिने दमदार फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. श्वेताने अवघ्या 37 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने अर्धशतक साकारले. यानंतर तिने आणखी आक्रमक भूमिका घेत अजून 9 चौकार मारले. यासह तिने 57 चेंडूत नाबाद 92 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या दोघींव्यतिरिक्त गोंगाडी त्रिशा हिने 15 आणि सौम्या तिवारी हिने 10 धावांचे योगदान दिले.

दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना सेशनी नायडू, मियाने स्मित आणि मॅडिसन लॅड्समन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेण्याची कामगिरी केली.

दक्षिण आफ्रिकेने चोपलेल्या 167 धावा
दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करताना शिमोन लॉरेन्सच्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतापुढे 165 धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळी शिमोनने 44 चेंडूत 61 धावा चोपलेल्या. या धावा करताना तिने 1 षटकार आणि 9 चौकारही ठोकले. मॅडिसन लॅड्समन हिने 17 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले होते. याव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाने खास कामगिरी केली नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना शेफाली वर्मा हिने 4 षटकात 31 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. तसेच, पार्शवी चोप्रा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (shweta sehrawat and shafali verma blistring inning lead india win against south africa in women u19 world cup 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोईन अलीची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या बाबतीत विराटसारखा खेळाडूच नाही’
उंचीवर जाऊन मैदानातच पडला चेंडू, तरीही पंचांनी दिला षटकार; व्हिडिओ जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---