शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023मधील पहिला उपांत्य सामना भारतीय महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात पार पडला. सेनवस पार्क येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 8 गड्यांनी विजय मिळवत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मजल मारली. भारताच्या या संपूर्ण प्रवासात युवा सलामीवीर श्वेता सेहरावत हिची महत्त्वाची भूमिका राहिली.
या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व वरिष्ठ संघात खेळत असलेली सलामीवीर शफाली वर्मा ही करत आहे. मात्र, संपूर्ण स्पर्धेत लक्ष वेधून घेण्यात तिची साथीदार श्वेता सेहरावत ही यशस्वी ठरली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारी श्वेता उजव्या हाताने फलंदाजी करते. संपूर्ण विश्वचषकात सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने सलामीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात तिने यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 92 धावांची खेळी केली. त्यानंतर युएईविरूद्ध नाबाद 74 व स्कॉटलंडविरूद्ध नाबाद 31 धावा तिने केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 21 व श्रीलंकेविरुद्ध 13 धावा करण्यात तिला यश आले. त्यानंतर आता उपांत्य फेरीच्या महत्त्वाचा सामन्यात तिने पुन्हा जबाबदारीने खेळ करत नाबाद 61 धावा चोपल्या. या सहा सामन्यात तिने एकूण 292 धावा कुटल्या असून, तिची सरासरी 146 अशी अविश्वासनीय आहे. त्यामुळे लवकरच ती वरिष्ठ भारतीय संघात दिसू शकते.
उपांत्य सामन्याचा विचार केल्यास, या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड महिला संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 107 धावा केल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने 14.2 षटकात 2 विकेट्स गमावत 110 धावा चोपल्या आणि पूर्ण केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे परंपरागत प्रतिस्पर्धी भिडताना दिसतील. स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.
(Shweta Sehrawat Flag Bearer Of Indian U19 Womens Team In U19 T20 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रांची टी20 मध्ये हार्दिक ‘टॉस का बॉस’! प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पृथ्वी बाकावरच
मोठी बातमी! भारतीय महिलांचा विश्वचषकात दबदबा, न्यूझीलंडला नमवत मिळवले फायनलचे तिकीट






