भारताचा वेगवान गोलंदाज ‘सिद्धार्थ कौल’ने (Siddarth Kaul) निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने भारतातील क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. सिद्धार्थने भारतीय संघासाठी 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्ये देखील खेळला आहे. सिद्धार्थ सनरायझर्स हैदराबाद (SRH), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह (RCB) अनेक संघांचा भाग होता.
वास्तविक, सिद्धार्थ कौलने (Siddarth Kaul) इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्याने सांगितले की भारतातील क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. तो आणि कोहली 2008 मध्ये एकाच संघाचा भाग होते. सिद्धार्थने 2018 मध्ये भारतासाठी पदार्पण एकदिवसीय सामना खेळला. तर याच वर्षी त्याने आपला पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला.
2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने सिद्धार्थचा संघात समावेश केला होता. याआधी त्याने 2013 मध्ये आयपीएल पदार्पण सामना खेळला होता. हैदराबादसोबतच सिद्धार्थ कोलकाता नाईट रायडर्स (KKR), दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळला आहे.
सिद्धार्थ कौलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 54 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 58 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. एका सामन्यात 29 धावांत 4 विकेट्स घेणे घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; आयपीएल 2025 मधील सर्व संघाचे संभाव्य कर्णधार!
पंजाब किंग्जच्या ‘या’ गोलंदाजाने गाजवले मैदान, घेतल्या 7 विकेट्स
IPL Mega Auction; यूपीचे ‘हे’ 8 क्रिकेटर लिलावात झाले मालामाल