---Advertisement---

मुंबईच्या ‘या’ खेळाडूला करायचीय तब्बल ७२ तास फलंदाज, वर्ल्डरेकॉर्ड करण्याचा आहे मानस

On: मंगळवार, मार्च 1, 2022 6:56 PM
---Advertisement---

मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सिद्धार्थ मोहिते (Siddharth Mohite) ७२ तास सतत फलंदाजी करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने फलंदाजीचा ५० तासांहून अधिक कालावधी पूर्ण केला आहे. त्याने २०१५ मध्ये पुण्याच्या विराग मारेचा ५० तासांचा वैयक्तिक फलंदाजी सत्राचा विक्रमही मोडला. १९ वर्षीय सिद्धार्थचा दावा आहे की, तो शुक्रवारी रात्रीपासून नेटमध्ये आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स डॉट कॉमनुसार, मारेने ५० तास, ४ मिनिटे, ५१ सेकंद फलंदाजी करून विश्वविक्रम केला होता. मारेने गोलंदाज आणि गोलंदाजीची मशीन या दोघांचा सामना केला, तर सिद्धार्थ फक्त गोलंदाजांचा सामना करत आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थला काहीतरी वेगळं करायचं होतं, जे बाकी क्रिकेटर्स करण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याने प्रशिक्षक ज्वाला सिंग यांना नेटमध्ये ७२ तास फलंदाजी करण्याची इच्छा सांगितली. सुरुवातीला प्रशिक्षकाने ते गांभीर्याने घेतले नाही, पण आठवडाभरानंतर सिद्धार्थ त्याच इच्छेने पुन्हा परतला. त्याचे प्रशिक्षक म्हणाले की, “एके दिवशी सिद्धार्थ आला आणि म्हणाला की सर, मला नेटमध्ये सतत ५२ तास फलंदाजीचा विक्रम मोडायचा आहे. मी यापूर्वी याबद्दल कधाीच ऐकले नव्हते. त्याने पुन्हा आग्रह केला. त्यानंतर मी ठाण्यात माझी सुविधा देईन, जिथे तो प्रयत्न करू शकेल, असे सांगितले.”

सिद्धार्थ त्याचा चुलत भाऊ आणि मित्रांशी बोलला, ज्यांनी गोष्टी सेट करण्यास मदत केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. कोणताही विक्रम करण्यासाठी स्वतंत्र साक्षीदारांची आवश्यकता असते.

सिद्धार्थचा चुलत भाऊ वैभव याने त्याच्या फलंदाजीवर ३ दिवस लक्ष ठेवण्यासाठी साक्षीदारांची व्यवस्था केली आहे. हे साक्षीदार २४ तासांच्या शिफ्टमध्ये त्याच्या फलंदाजीवर लक्ष ठेवून आहेत. साक्षीदार ब्रेकची संख्या आणि कालावधी देखील लिहितात. संपुर्ण फलंदाजीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचे काम एका व्यक्तीला दिले आहे.

सिद्धार्थला दर तासाला ५ मिनिटे ब्रेक घेण्याची परवानगी आहे. तो वॉशरुमला जाण्यासठी ब्रेक घेऊ शकतो. त्याला हवे असल्यास तो ब्रेक न घेता तासनतास फलंदाजी करू शकतो. त्या नेट्सजवळ बेडची व्यवस्था करण्यात आली असून खाद्यपदार्थांची पाकिटेही ठेवण्यात आली आहेत. सिद्धार्थ केवळ प्रोटीनयुक्त पदार्थ आणि पेये घेत आहे, जेणेकरून त्याच्या शरीराला दीर्घकाळ फलंदाजी करण्यासाठी ऊर्जा मिळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या –

मॅक्सवेल ते रबाडा, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकू शकतात ‘हे’ मोठे परदेशी खेळाडू

‘टी२० क्रिकेटमध्ये डॉट बॉल खेळणे हा गुन्हा’, श्रेयस अय्यर का म्हणाला असं? घ्या जाणून

‘हिटमॅन’चे ट्विटर अकाऊंट हॅक? रोहितच्या विचित्र ट्वीट्सची मालिका पाहून चाहते गोंधळले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---