काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी दिग्गज फंलदाज सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जून तेंडूलकर याने मुंबई रणजी संघ सोडण्याचा निर्णय घेतला. अशातचं आता मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज ३० वर्षीय सिद्धेश लाडने देशांतर्गत क्रिकेटसाठी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतले आहे.
यानंतर तो पुढील हंगामात इतर कोणत्याही राज्याकडून खेळताना दिसणार आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास आगामी काळात तो गोव्यासाठी राज्यस्तरीय क्रिकेट खेळू शकतो. विशेष म्हणजे अर्जून तेंडूलकरने देखील मुंबईचा संघ सोडल्यानंतर गोव्यासाठी आगामी काळात देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘सूर्यकुमार यादव अन् एबी डिविलियर्समध्ये फारसा फरक नाही’, तीन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराचा दावा
राशिदने सामनावीर पुरस्कारावर पाणी सोडतं जिंकली मने, वाचा विशेष कामगिरी