जुनी प्रभादेवी येथील ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या विध्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने संपूर्ण मुंबई मध्ये प्रथमच एका मंडळाने “बीच कबड्डी (ज्युनिअर मुले) कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिद्धीप्रभा फाउंडेशनने अजिंक्यपद संपादन केले आणि ओ.डी. एम. करंडक पटकाविला.
सुरुवातीपासूनच सिद्धीप्रभा आणि विजय क्लब या दोन बलाढ्य संघांमध्ये विजेतेपदासाठी झुंज पहायला मिळाली सिद्धीप्रभाच्या अनिकेत भेलसकर याच्या आक्रमक चढाया त्यांना ओंकार ढवळे याची मिळालेली पकडीची साथ यामुळे शेवटी विजय क्लबला ४३-३८ असे नाममात्र ५ गुणाने नमविले.
विजय क्लबच्या अभिषेक रुपणार आणि रोशन थापा यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. मध्यांताराला २०-१६ अशी गुणांची आघाडी घेऊन सिद्धीप्रभा आघाडीवर होती.
संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अनिकेत भेलसकर(सिद्धीप्रभा), आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई आणि पकड साठी अनुक्रमे अभिषेक रूपनर(विजय क्लब) आणि ओंकार ढवळे (सिद्धीप्रभा) यांची निवड करण्यात आली.
अंतिम विजयी संघाला रोख ₹ ७०००/- व ओ.डी. एम. करंडक आणि अंतिम उपविजयी संघाला रोख ₹ ५०००/- व ओ.डी. एम. करंडक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरसेविका सभागृह नेत्या, माजी आमदार सौ. विशाखाताई राऊत, मा.शाखाप्रमुख श्री. महेश सावंत, श्री.रवी जोशी, चिनू स्पोर्ट्स चे श्री.राजन पाटील, मु.श.क.असो. चे प्रमुख कार्यवाह श्री. विश्वास मोरे सर यांच्या उपस्तीतीत संपन्न झाला.
यावेळी मंडळाचे संस्थापक श्री.मोहन दाभोलकर,अध्यक्ष श्री.संजय करंबेले, सरचिटणीस श्री.अनिल गुरव, खजिनदार श्री. विनायक परब उपस्तीत होते