---Advertisement---

अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजीत जलवा, संघाला मिळवून दिला एकतर्फी विजय!

On: सोमवार, ऑक्टोबर 21, 2024 10:03 AM
Arjun-Tendulkar
---Advertisement---

सध्या भारतामध्ये देशांतर्गत क्रिकेटची धूम सुरू आहे. गेल्या महिन्यात दुलीप ट्रॉफी आणि इराणी चषक खेळला गेला. आता रणजी ट्रॉफी खेळली जात आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गोव्यानं सिक्कीमविरुद्ध शानदार विजयाची नोंद केली. गोव्यानं हा सामना एक डाव आणि 53 धावांनी जिंकत सलग दुसरा विजय नोंदवला.

गोव्याच्या विजयात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा महत्त्वाचा वाटा होता. त्याला या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही, मात्र त्यानं दोन्ही डावात गोलंदाजीत आपलं कौशल्य दाखवलं. अर्जुनने या सामन्यात दुसऱ्या डावात घेतलेल्या 4 विकेट्ससह एकूण 6 विकेट्स घेतल्या.

अर्जुन तेंडुलकरला या रणजी हंगामाच्या पहिल्या फेरीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं. अर्जुननंही त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. त्यानं सिक्कीमच्या पहिल्या डावात सलामीवीर अरुण छेत्री आणि मधल्या फळीतील फलंदाज पार्थ पलावतला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. अर्जुननं 14 षटकांत 5 मेडन्ससह 31 धावा दिल्या आणि दोन बळी घेतले.

यानंतर सिक्कीमच्या दुसऱ्या डावात अर्जुनचा कहर पाहायला मिळाला. त्यानं प्रथम दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवलं. यानंतर त्यानं पार्थ आणि अरुणला दुसऱ्यांदा आपला शिकार बनवलं. दुसऱ्या डावात अर्जुननं 20 षटकात 2 मेडनसह 81 धावा दिल्या आणि चार विकेट घेतल्या. अशाप्रकारे या सामन्यात त्यानं एकूण सहा विकेट्स घेतल्या.

अर्जुनच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्यानं आतापर्यंत 14 सामने खेळले. या कालावधीत त्यानं गोलंदाजीत 27 विकेट्स घेतल्या असून फलंदाजीत 481 धावा केल्या आहेत. अर्जुन हा अष्टपैलू खेळाडू मानला जातो. त्यानं हे अनेक प्रसंगी सिद्ध केलं आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अर्जुनचं भाग घेण्याची शक्यता आहे. आता त्याच्यावर कोणता संघ बोली लावतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल. सध्या तो पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा भाग आहे.

हेही वाचा – 

विश्वास करणे कठीण, सलग 10 सामने हरलेला संघ बनला विश्वविजेता!
टी20 वर्ल्डकप जिंकून न्यूझीलंड मालामाल, आयसीसीनं भारतावरही केला करोडोंचा वर्षाव
Women’s T20 World Cup; फायनलमध्ये आफ्रिकेला चितपट करून न्यूझीलंडने जिंकला विश्वचषक!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---